स्मारक व तडजोडीच्या मुद्यावरून सभेत वादळ

By Admin | Updated: June 19, 2016 03:00 IST2016-06-19T03:00:37+5:302016-06-19T03:00:37+5:30

पाणीपट्टी थकबाकीदारांना बिलात ५० टक्के सवलत योजना आणली आहे. एकमुस्त तडजोड शुल्क भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Storm at the meeting from the issue of reconciliation and reconciliation | स्मारक व तडजोडीच्या मुद्यावरून सभेत वादळ

स्मारक व तडजोडीच्या मुद्यावरून सभेत वादळ

महापालिकेची सोमवारी सभा : सत्तापक्षाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक आक्रमक
नागपूर : पाणीपट्टी थकबाकीदारांना बिलात ५० टक्के सवलत योजना आणली आहे. एकमुस्त तडजोड शुल्क भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु यामुळे नियमित बिल भरणाऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच यशवंत स्टेडियमच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सिटी ट्रान्सपोर्ट स्टँड उभारण्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी आणला आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद या सभेत उमटणार असल्याने ही सभा चांगलीच वादळी ठरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.
थकीत पाणीपट्टीचा विषय विरोधी सदस्यांनी चर्चेसाठी दिला आहे. शुक्रवारी सत्तापक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यात पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली तर शनिवारी दुपारी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना वेळेत सभागृहात उपस्थित होण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी जेव्हा-जेव्हा त्यांनी पक्षाच्या सदस्यांना वेळेत सभागृहात उपस्थित होण्याचे निर्देश दिले तेव्हा-तेव्हा सभागृहात गोंधळ झाला आहे. त्यामुळे सोमवारची सभा चांगलीच वादळी ठरण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुका विचारात घेता महापालिकेतील सत्तापक्ष व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचे पडसाद महापालिकेतील राजकीय घडामोडीवर होत आहे.
आंबेडकरवादी संघटना, बसपा, भारिप बहुजन महासंघ यांनी सिटी ट्रान्सपोर्टला स्मारकाची जागा देण्याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सभागृहातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Storm at the meeting from the issue of reconciliation and reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.