शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्याच कथा आयुष्य बदलवू शकतात

By admin | Updated: April 11, 2016 03:13 IST

साधारणत: सेलिब्रिटींच्या कथा आणि त्यांचा संघर्ष सामान्य माणसांना सांगितला जातो आणि त्यावर पुस्तकेही येतात.

संदीपकुमार साळुंखे : प्रयास सेवांकुरतर्फे ‘अलग राह’ उपक्रमात रौप्य महोत्सवी मुलाखत नागपूर : साधारणत: सेलिब्रिटींच्या कथा आणि त्यांचा संघर्ष सामान्य माणसांना सांगितला जातो आणि त्यावर पुस्तकेही येतात. काही लोकांच्या आयुष्यात खरेच संघर्ष असतोही पण त्या कथा सामान्य गरीब युवकांना प्रेरित करीत नाही. कारण त्यांचे जीवन वेगळे असते. त्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी संघर्षातून मिळविलेले यश आपल्याला अधिक जवळचे वाटते कारण यश मिळविणाराही आपल्यातलाच कुणीतरी असतो. एखाद्या व्यक्तीला यशाचा हा टप्पा गाठता आला तर आपणही तो गाठू शकतो, याचा विश्वास सामान्यांच्या यशातून येतो आणि आपले आयुष्य बदलते, असे मत संयुक्त आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. प्रयास, सेवांकुरचे अमरावती येथील संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी ‘अलग राह’ हा वेगळ्या वाटांनी यशस्वी होणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखतीचा उपक्रम सुरू केला. या मालिकेतला हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आज चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अविनाश सावजी यांनी मुलाखतीद्वारे संदीपकुमार साळुंखे यांचा प्रवास उलगडला. साळुंखे युवा अधिकारी आहेत. प्रामाणिक आणि सक्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा व्यक्तिगत प्रवासही प्रेरणात्मक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा आहे. याप्रसंगी त्यांनी शिक्षण घेताना करावा लागलेला संघर्ष आणि प्रतिकुलतेतून त्यांनी कसा मार्ग शोधला, याची अनेक उदाहरणे सांगितलीत. अभिनिवेश न बाळगता सहजपणे आपला प्रवास सांगताना त्यांनी युवा विद्यार्थ्यांना लढण्याची जिद्द दिली. आपण लहानपणापासून सामान्य वातावरणात वाढलो. घरात सुबत्ता नव्हती त्यामुळे अभ्यास करून घरातही हातभार लावायचा, हा संस्कार मनावर झाला. यातून बरेच काही शिकता आले. त्यामुळेच माझी ओळख माझे गाव असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. तारुण्यात एखाद्या मोहाला आपण सहजपणे बळी पडतो आणि त्यातून आजारपण येऊ शकते. याचा अनुभवही त्यांनी सहजपणे सांगितला. चुकण्यापेक्षाही पुन्हा चूक न करणे आणि सुधार करीत राहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)