शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

विकासात अडथळे आणण्याचा प्रकार बंद करणार

By admin | Updated: March 5, 2016 03:19 IST

भाजपने शहर विकासाचा दहा वर्षाचा कार्यक्रम दिला होता. महापालिका निवडणुकीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे.

बंडू राऊत : फाईल्सचा प्रवास कमी करण्यावर भरनागपूर : भाजपने शहर विकासाचा दहा वर्षाचा कार्यक्रम दिला होता. महापालिका निवडणुकीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यादृष्टीने नियोजन करून आश्वासन पूर्तीसाठी शिल्लक असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. यात कोणतीही तडजोड नाही. काही शुल्लक त्रुटी काढून विकास कामात अधिकाऱ्यांकडून अडथळे आणण्याचा प्रकार बंद केला जाईल, असे स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बंडू राऊ त यांनी शुक्र वारी स्पष्ट केले. स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थायी समितीला दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अर्थसंकल्प ३१ मार्चला सादर करून विकास कामे तातडीने सुरू करावी लागतील. निवडणुकीमुळे दोन महिन्यांचा कालावधी कमी मिळणार असल्याने अधिकाऱ्यांना दररोज एक तास अधिक क ाम करण्याचे आवाहन करणार आहे. यातून विकासाला गती मिळेल. विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी फाईल्सचा प्रवास कमी करावा लागेल. एकाच अधिकाऱ्यांकडे एकच फाईल अनेकदा जाते. यामुळे मंजुरीला विलंब होत असल्याने विकास कामावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा बसावा. यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. २०१७ सालातील निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकासाचे नियोजन करावे लागेल. सुरेश भट सभागृहाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जाईल. तसेच अंबाझरी टी-पॉर्इंट येथील स्वामी विवेकानंद यांचा भव्य पुतळा दोन महिन्यात उभारला जाईल. कस्तूरचंद पार्क येथे उंच राष्ट्रध्वज उभारण्याचे काम तातडीने केले जाईल. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती राऊ त यांनी दिली. (प्रतिनिधी)