शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

थांबा..., उगीच मारू नका साप ! सर्पमित्रांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:28 PM

साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.

ठळक मुद्देसाप निघाल्यास कळवा अन् पर्यावरण वाचवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साप मारले जातात. यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी साप न मारता त्यांना आपल्या स्वाधीन करण्याचे आवाहन नागपुरातील सर्पमित्रांनी केले आहे.नागपूर शहरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्यात सापांच्या रक्षणासाठी कार्य करणाऱ्या संघटना आणि सर्पमित्रांचेही प्रमाण अधिक आहे. वन्यजीव संरक्षण समिती नागपूर, विदर्भ सर्पमित्र संघटना, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन, नागपूर वाईल्ड लाईफ, हेल्प फॉर अ‍ॅनिमल, हेल्पींग हँड फॉर अ‍ॅनिमल यासारख्या अनेक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात आणि शहरालगतच्या क्षेत्रात सेवा देणारे सर्पमित्र कार्यरत आहेत. साप निघाल्यावर नागरिकांनी संपर्क केल्यावर घटनास्थळी पोहचून सापाला पकडून सुरक्षितपणे मानवी वसाहतीबाहेर सोडण्याचे काम हे पर्यावरणपे्रमी करीत असतात.पावसाळ्याची सुरुवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थानी पावसाचे पाणी शिरल्यास साप जमिनीबाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात. अशा वेळी सर्पदंशाची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात गम बुट वापरणे, शुज पायात घालताना खबरदारी घेणे, अडगळीच्या ठिकाणी हात घालणे टाळणे, लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाºया पाली आणि बेडकांच्या शोधात येण्याची सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे यासारखी जुजबी खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते. सापांच्या २ हजार ७०० जाती असल्या तरी विदर्भात फक्त नाग, मन्यार, घोणस, फुरसे या चार जातीचे विषारी साप प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे साप न मारता आम्हाला कळवा आणि पर्यावरण वाचवा, असे आवाहन सर्पमित्रांकडून होत आहे.नागपूर शहर व लगतच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्पमित्र

  • श्रीकांत उके (अजनी) - ९८६००३२१२१
  • विश्वजित उके (सक्करदरा नंदनवन) - ९८९०५२२६६०
  • स्वप्निल बोधाने (बेसा, मनीषनगर ) - ९९२३८९१२३०
  • अनिकेत सुरूशे (हुडकेश्वर)- ९५५२६६६६०५
  • भूषण पुजारी (दिघोरी उमरेड रोड) - ७३५०१७५१३६
  • प्रतीक विद्वंस (पिपला रोड) - ७९७२०८३२३०
  • समीर तुंबडे (मानकापूर, गोधनी) - ९७३०६७७७७५
  • कुणाल जरविया (सिव्हिल लाईन, बर्डी) - ७३८५३२८९८७
  • आशिष मेंढे (म्हाळगीनगर)- ८७९३७८३९८४
  • अंकित खलोडे (वाठोडा खरबी) - ९८३४४४५४३६८
  • सतीश जांगडे (पारडी रोड) - ८७९८६०२७८१
  • अभिषेक देवगिरीकर (नरसाळा) - ७२१८९८१२९२
  • सचिन झोडे (बेलतरोडी घोगली)- ९७६५८५९६८७

असा करावा प्रथमोपचारसर्पदंश झाल्यावर रुग्णाच्या शरीरातून हृदयाकडे येणारा रक्तप्रवाह थांबवावा. हृदय उंचावर असेल असे झोपवावे. रुग्णाला कडुलिंबाची पाने खायला देऊ नयेत. पायी चालवू नये. हृदयाकडे रक्तप्रवाह होणार नाही अशा पद्धतीने रिबीन अथवा क्रॅप बँडेज बांधावे आणि तात्काळ रुग्णालयात न्यावे.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर