महामार्गांवर झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांचे बिल थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:18+5:302021-04-05T04:08:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय महामार्गांची कामे करताना अनेकदा झाडे योग्य पद्धतीने लावली नसल्याच्या तक्रारी येतात. करारात समावेश ...

Stop billing contractors who don’t plant trees on highways | महामार्गांवर झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांचे बिल थांबवा

महामार्गांवर झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांचे बिल थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय महामार्गांची कामे करताना अनेकदा झाडे योग्य पद्धतीने लावली नसल्याच्या तक्रारी येतात. करारात समावेश असूनदेखील महामार्गांवर झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाचे बिल थांबविण्यात येईल तसेच अपूर्ण कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांनादेखील शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. झारखंडमधील ३ हजार ३५० कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कामाच्या दर्जात कोणताही समझोता खपवून घेतला जाणार नाही. उड्डाणपुलांचे ‘एक्पान्शन’ जोड योग्य पद्धतीने जोडले गेले नाही, तर ते पुन्हा कंत्राटदारांना लावावे लागतील. झाडे लावण्याच्या कामाचे ई-टॅगिंग व व्हिडीओ रेकॉर्डिंग करून कामाचे रेकॉर्ड ठेवा. कामाचा दर्जा चांगला नसला, तर रस्ता उखडून टाकू व संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम मिळणार नाही. कंत्राटदारांचे रेटिंग केले जात आहे. या रेटिंगमध्ये जे कंत्राटदार मागे राहतील, त्यांचे गुण कमी केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ५४ प्रकल्पांना मंजुरी

नितीन गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन अंतर्गत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या ५४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. ८२९ किमीच्या या राष्ट्रीय महामार्गांसाठी ४ हजार ५९० कोटी रुपयांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातील महामार्गांचे बळकटीकरण, पुलांचे बांधकाम, सुधारणा व अन्य कामांचा यात समावेश आहे.

Web Title: Stop billing contractors who don’t plant trees on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.