शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नागपुरात मनपाच्या पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:37 IST

मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तणावाच्या वातावरणात येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला.

ठळक मुद्देविरोधाला न जुमानता मोमीनपुऱ्यात अतिक्रमणावर बुलडोजर : जेसीबीचे काच फोडले; पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात तणावाच्या वातावरणात येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला.पथकाने ७० अतिक्रमण हटविले. यात शेड, अनधिकृत बांधकाम, ओटे आदींचा समावेश आहे. पोलीस बंदोबस्तात पथकाने सुरुवातीला भगावघर चौकातून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर मोमीनपुरा गेटमधून मोमीनपुरा चौक, एमएलए कॅन्टीन रोड व पुढे जामा मशीदपर्यंतच्या मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले. अन्सारनगर रोड येथील इरोज मेडिकल स्टोर्सलगतच्या बोळीतील टिनाच्या कुंपणावरून वाद होता. येथील टिन हटविण्यात आले. कारवाईला विरोध करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु अन्सारनगर येथे पथक पोहचल्यानंतर लोकांनी एनआयटीचे ले-आऊ ट असल्याचा दावा करीत काही जणांनी कारवाईला विरोध दर्शविला. परंतु पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरूच ठेवली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजय कांबळे, मंजूर शाह, नितीन मंथनवार, जमशेद आली, संजय शिंगणे, शरद इरपाते यांच्यासह पथकाने केली.पथकातील अधिकाऱ्यांना धमक्याअंसारनगर रोडवर पथकातील कर्मचाऱ्यांना निर्देश देणाऱ्या अधिकाऱ्यांशी एका अतिक्रमणधारकाने वाद घातला. अधिकाऱ्याला बघून घेण्याची त्याने धमकी दिली.अखेर अतिक्रमण हटविलेअन्सारनगर येथील रोड ४० फुटाचा होता. परंतु रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने हा रोड २० फुटाचा झाला. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाद निर्माण होतात. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होती. अनेकदा यासंदर्भात तक्रारी केल्या. अनेक वर्षांनंतर अखेर मंगळवारी या भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हॉटेल व्यावसायिकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.तीन अनधिकृत धार्मिक स्थळे तोडलीसतरंजीपुरा झोनमधील विविध भागातील तीन अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्यात आले. यात बिनाकी मंगळवारी येथील सोनारटोली, किनखेडे ले-आऊ ट व पोहाओळ इतवारी येथील धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाEnchroachmentअतिक्रमण