चोरीची कार, दुचाकी आणि मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:13 IST2021-05-05T04:13:14+5:302021-05-05T04:13:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बजाजनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून कार, चोरीच्या दुचाकी तसेच मोबाईल ...

Stolen car, bike and mobile seized | चोरीची कार, दुचाकी आणि मोबाईल जप्त

चोरीची कार, दुचाकी आणि मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बजाजनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून कार, चोरीच्या दुचाकी तसेच मोबाईल जप्त करण्यात आले.

वैभव नारायण भांडेकर (वय २९) असे आरोपीचे नाव असून, तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम सोसायटी, सीम टाकळी येथे राहतो.

लक्ष्मीनगरातील योगिराज आशिष अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड असलेले शंकर संभाजी सोमकुवर यांचा मोबाईल २ मे रोजी दुपारी १२.३० वाजता चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी भांडेकरला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मोबाईल जप्त केल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने प्रतापनगरमधून एक कार, जयताळा, कोतवाली, धंतोली परिसरातून दुचाकी तसेच सदर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ही वाहने आणि मोबाईल असा एकूण एक लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग फुलझेले, संजयसिंग ठाकूर, विनोद द्विवेदी, सुभाष गजभिये, नीतेश वाकडे, नितीन राऊत, मुरलीधर चौधरी आणि धीरज थोटे यांनी ही कामगिरी बजावली.

---

Web Title: Stolen car, bike and mobile seized