वनव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'शिव पीक रक्षण योजने'चे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:32 IST2020-12-10T11:31:47+5:302020-12-10T11:32:16+5:30
जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान वन्यप्राण्यांपासून टाळावे, तसेच वन्यजीव संघर्षाच्या घटना टाळता याव्या यासाठी वनविभाग 'शिव पीक रक्षण' ही योजना राबविणार आहे.

वनव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'शिव पीक रक्षण योजने'चे पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान वन्यप्राण्यांपासून टाळावे, तसेच वन्यजीव संघर्षाच्या घटना टाळता याव्या यासाठी वनविभाग ही योजना राबविणार आहे. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मागणीनुसार सौर ऊर्जा कुंपण या योजनेतून दिले जाणार आहे. 100 कोटी रुपयांची तरतूद या योजनेत असून 10 ते 15 हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांवर खर्च होणार आहे. यात 75 टक्के खर्चाचा वाटा वनविभाग आणि 25 टक्के खर्चाचा वाटा शेतकऱ्यांनी उचलावा, असे प्रस्तावित आहे.
2014-15 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ही योजना स्थानिक स्वरूपावर राबविण्यात आली होती. ती आता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.