शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसबाबत गंभीर राहा; हायकोर्टाचा नागपुरातील शाळांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:52 IST

स्कूलबसवरील प्रकरणाबाबत गंभीर राहण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी शाळांना दिला.

ठळक मुद्देतांत्रिक मुद्यांवर आठ शाळांचे अर्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : स्कूलबसवरील प्रकरणाबाबत गंभीर राहण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी शाळांना दिला.स्कूलबस नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर न करणाऱ्या शाळांच्या यादीमध्ये चुकीने नाव आल्यामुळे नारायणा विद्यालय वर्धा रोड, तुली पब्लिक स्कूल, इनफन्ट जिसस स्कूल, जी. एच. रायसोनी विद्यानिकेतन हिंगणा रोड यांच्यासह एकूण आठ शाळांनी न्यायालयात अर्ज सादर करून संबंधित यादीतून नाव वगळण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून शाळांचे कान टोचले. हे प्रकरण सर्वांनी गांभिर्याने घ्यावे. अन्यथा यापुढे निर्ढावलेपणा खपवून घेतला जाणार नाही असे शाळांना सुनावण्यात आले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.स्कूलबस नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या शाळांच्या बसेस येत्या १० जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहे. उर्वरित शाळांना कोणत्याही परिस्थितीत १० जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची नाराजी दूर करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्या स्कूलबसेसची चाके थांबविली जाऊ शकतात. या आदेशाची माहिती शाळांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षण उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.यासंदर्भात न्यायालयात २०१२ पासून जनहित याचिका प्रलंबित असून विद्यार्थ्यांना बसची सुविधा देणाऱ्या १३७ शाळांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. सुरुवातीला न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर एकाही शाळेने स्वत: किंवा वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित होऊन उत्तर दाखल केले नव्हते. त्यानंतर शाळांना उत्तरासाठी अंतिम संधी देण्यात आली होती. त्या आदेशाचेही शाळांनी पालन केले नाही. परिणामी न्यायालयाने प्रत्येक शाळेवर पाच हजार रुपये दावा खर्च बसवून उत्तर सादर करण्यास सांगितले. दरम्यान, काही शाळा न्यायालयात हजर झाल्या. उर्वरित शाळांना उपस्थित करण्यासाठी न्यायालयाने मुख्याध्यापक व संस्थाध्यक्षांविरुद्ध वॉरन्ट जारी केला. परिणामी, आणखी काही शाळा न्यायालयात धावत आल्या. त्यानंतर उर्वरित शाळांचा दावा खर्च दहा हजार रुपये करण्यात आला. असे असतानाही काही शाळा न्यायालयात हजर झालेल्या नाहीत. त्या शाळांच्या स्कूलबसेसवर १० जानेवारीपासून कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र असून त्यांना अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा