राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मनपाने उभारावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:30+5:302021-07-04T04:06:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या वतीने नागपूर शहरात उभारण्यात यावा, अशी ...

Statue of Rajarshi Shahu Maharaj should be erected in mind () | राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मनपाने उभारावा ()

राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मनपाने उभारावा ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या वतीने नागपूर शहरात उभारण्यात यावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर दयाशंकर तिवारी यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले.

शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष अरुण गजभिये, कपिल लिंगायत, अजय चव्हाण, बाळूमामा कोसमकर, तुषार चिकाटे, दिलीप पाटील, रवी बाणमरे, भगवान भोजवाणी, विपीन गाडगीलवार, संजय नारोंदेकर, पीयूष हलमारे, स्वप्निल महल्ले, अक्षय नानवटकर, कुशीनारा सोमकुवर, कुशल सिंग ठाकूर, महिंद्र पावडे, उत्तम हुमणे, मनीष जीवने, प्रशिक मेश्राम, इशांत लोखंडे, सचिन जेठाणी, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Statue of Rajarshi Shahu Maharaj should be erected in mind ()