लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थानांतरित करायचा नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पुतळा स्थानांतरित करण्याविरुद्ध स्थानिक नागरिकांनी दाखल केलेला अर्ज निकाली काढला.उच्च न्यायालयात शेगावच्या सर्वांगीण विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पुतळा स्थानांतरणासह अन्य विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आवश्यक आदेश जारी करण्यासाठी प्रकरणावर गुरुवारी सुनावणी निश्चित करण्यात आली. या प्रकरणात अॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र असून संत गजानन महाराज संस्थानतर्फे अॅड. अरुण पाटील यांनी बाजू मांडली.
शेगावमधील बाबासाहेबांचा पुतळा हटणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:03 IST
शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थानांतरित करायचा नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने पुतळा स्थानांतरित करण्याविरुद्ध स्थानिक नागरिकांनी दाखल केलेला अर्ज निकाली काढला.
शेगावमधील बाबासाहेबांचा पुतळा हटणार नाही
ठळक मुद्देराज्य सरकारची हायकोर्टात माहिती