‘आयएमए’ नागपूरला राज्यस्तरीय पुरस्कार; सर्वाधिक सदस्यांची नोंदणी
By सुमेध वाघमार | Updated: August 18, 2023 18:12 IST2023-08-18T18:08:17+5:302023-08-18T18:12:54+5:30
सदस्यत्व मोहीम समिती व पदाधिकाऱ्यांचे कौतुक

‘आयएमए’ नागपूरला राज्यस्तरीय पुरस्कार; सर्वाधिक सदस्यांची नोंदणी
नागपूर : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
‘आयएमए’ महाराष्ट्रच्यावतीने नुकतीच बारामती येथे राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी नागपूर ‘आयएमए’ने सर्वाधिक, १३९ नवीन सदस्यांची नोंदणी केली. याची दखल घेत हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ.वंदना काटे, सचिव डॉ.कमलाकर पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्यत्व मोहीम समिती व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. सदस्यत्व मोहीम समितीमध्ये आयएमए महाराष्ट्र राज्य सभापती डॉ. प्रशांत निखाडे, डॉ संजय देवतळे, डॉ राजेश सवरबांधे, डॉ दिनेश अग्रवाल, डॉ प्रशांत राठी, डॉ सुभाष ठाकरे आदींचा समावेश आहे.