शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरमधील लाकूड व्यापाऱ्यावर राज्य जीएसटीचा छापा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 3, 2024 23:18 IST

कापसी-लकडगंज येथील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

नागपूर : शहरातील एका आघाडीच्या लाकूड व्यावसायिकावर राज्याच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईमुळे लकडगंज आणि कापसी येथील लाकूड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही कारवाई होत असल्याने लाकूड बाजारात विविध चर्चेला उधाण आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकासह सकाळी विनोद गोयनका नावाच्या लाकूड व्यावसायिकाच्या भंडारा रोडच्या ६८/२, कापसी खुर्द येथील युनिटवर छापा टाकला. याशिवाय गोयनका यांच्या इतर दोन ते तीन ठिकाणीही ही कारवाई करण्यात आली. या काळात कागदपत्रे तपासण्याचे काम दिवसभर सुरू होते. राज्य जीएसटी विभाग, मुंबईच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.हे प्रकरण बनावट बिलांद्वारे जीएसटी चोरीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जीएसटी न भरला सरकारी विभागांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारवाईबाबत विनोद गोयनका यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरूवित्त मंत्रालयाने अलीकडेच सर्व राज्यांच्या जीएसटी विभागांना बनावट जीएसटी बिले आणि आयटीसी बनवणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. नागपुरातही ५०० हून अधिक खातेदारांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सापडलेल्या बड्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने विनोद गोयनका यांच्यावरही कारवाई होत असल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी