शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

दवाखाना आपल्या दारी अभियानाला राज्य शासनाची मंजूरी

By आनंद डेकाटे | Updated: November 10, 2023 16:39 IST

जिल्ह्यातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला आधुनिक तत्पर व शासकीय खर्चात उच्च दर्जाचे आरोग्य कवच देणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाला जिल्ह्यामध्ये राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.छत्रपती सभागृहामध्ये जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी उपस्थितांना ही माहिती दिली. नागपूर जिल्ह्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून सुरु करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तातडीची तसेच गंभीर आजाराला प्रतिबंध करणारी, आगाऊ माहिती देणारी यंत्रणा विकसित करण्याबाबत जिल्हाधिकारी प्रयत्नरत होते. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

- काय आहे योजना

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम राबविणे, माता, बाल मृत्यूदर कमी करणे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, ३० वर्षावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब वर्षातून एकदा तपासणी करणे, कर्करोग पूर्व तपासणी ५ वर्षातून एकदा करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबविणे त्याचबरोबर अन्न, पोषण, स्वच्छता याबाबतीत जनजागृती, बालकांचे व मातांचे लसीकरण, गावपातळीवर करणे , सुदृढ समाजाची निर्मिती करणे, आरोग्यप्रती ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिकात जागरुकता निर्माण करणे, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड काढणे हे या योजनेचे मुळ उद्दीष्ट आहे.

- कशी करणार अंमलबजावणी

आरोग्यवाहिनी नावाच्या वाहनामध्ये औषधांच्या साठ्यासह डॉक्टरांची उपलब्धता ठेवण्यात येणार आहे. यासाठी २६ आरोग्यवाहिनी वाहन तयार करण्यात आले आहे. आरोग्यवाहिनीच्या सोबतीला गावपातळीवरील यंत्रणादेखील नियोजित कार्यक्रमानुसार त्या-त्या गावात उपस्थित राहणार आहेत. वैद्यकीय सुविधांसोबतच त्या मिळविण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक तसेच लिपीकवर्गीय मनुष्यबळदेखील उपलब्ध केले जाणार आहे. किती लोकांची रोज तपासणी झाली, त्याचे अहवाल दिवसाला तयार होणार असून जीपीएस प्रणालीद्वारे जिल्हा यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवणार आहे.

- कोण ठेवणार नियंत्रण

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात ही योजना गावात राबविली जाणार आहे. अंगणवाडी सेविका व गावपातळीवरील आशा व अन्य कर्मचारी यामध्ये कार्यरत असतील. सोयीच्या ठिकाणी आरोग्यवाहिनी गावात पोहोचेल व प्राथमिक तपासण्या करेल. तपासणीअंती रुग्णांना गरज वाटल्यास संदर्भसेवा देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान मार्फत ही नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकारSocialसामाजिक