नागपूरच्या भिवसनखोरीत हातभट्टी केंद्रावर उत्पादन शुल्क विभागाची धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:54 PM2020-04-04T20:54:16+5:302020-04-04T20:55:17+5:30

राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

State excise raid on Bhiwasankhori hat bhatti in Nagpur | नागपूरच्या भिवसनखोरीत हातभट्टी केंद्रावर उत्पादन शुल्क विभागाची धाड 

नागपूरच्या भिवसनखोरीत हातभट्टी केंद्रावर उत्पादन शुल्क विभागाची धाड 

googlenewsNext
ठळक मुद्दे३२.५० लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टी दारूविक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, परिमंडळ २ च्या उपायुक्त विनिता साहू, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी या दारूभट्टीवर धाड टाकली. कारवाईत सहभागी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षेची सर्व साधने पुरवून दोघांमध्ये ५ फू ट अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी भिवसनखोरीतील वेगवेगळ्या रस्त्यांनी सर्वजण आत गेले. यावेळी २०० लिटर क्षमतेचे १८ रिकामे बॅरल, २०० लिटर क्षमतेचे १५० लोखंडी मोहरसाने भरलेले बॅरल, २०० लिटर क्षमतेचे १७० बॅरल, जमिनीत पुरलेल्या ३ टाक्या, ५० लिटर क्षमतेचे १३९५ बॅरल, जर्मनची २५ भांडी, स्टीलचे ३० चाकू, १५ लिटर क्षमतेचे १८० रिकामे डबे जप्त करण्यात आले. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ४५ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तपास निरीक्षक रावसाहेब कोरे करीत आहेत.

Web Title: State excise raid on Bhiwasankhori hat bhatti in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.