भरतवाडा परिसरातील अर्धवट कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST2020-12-13T04:25:28+5:302020-12-13T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भरतवाडा परिसरात गडर लाईन, सिमेंट रस्ते आणि पावसाळी नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. ...

भरतवाडा परिसरातील अर्धवट कामे सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरतवाडा परिसरात गडर लाईन, सिमेंट रस्ते आणि पावसाळी नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु कोविडचा संसर्गामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये ही सर्व कामे बंद करण्यात आली. आता अनलॉक होऊनही कामे बंदच आहेत. ती तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नगरिकांनी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांना दिलेल्या निवेदनातून केली.
अपूर्ण कामांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणची अपूर्ण कामे नागरिकांच्या जीवाला धोकाही ठरत आहेत. त्यामुळे अडथळे दूर करून सर्व कामे सुरू करावी, अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात बंडू पिल्लेवान, नंदलाल बिसेन, किशोर नागपुरे, हरीश जयस्वाल, अयुब कुरेशी, हितेश रंगारी, सुनील देशभ्रतार, उदय शर्मा, संजय पालांदूरकर आदींचा समावेश होता.