शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आमची शाळा सुरू करा... सुरू करा : सोनेगावच्या मनपा शाळेत चिपको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:56 IST

सरकारी शाळा वाचवा कृती समितीने राबविलेल्या अभियानांतर्गत यावेळी सोनेगाव येथील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत चिपको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थी, नागरिकांनी शाळेला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी शाळा वाचवा कृती समितीने राबविलेल्या अभियानांतर्गत यावेळी सोनेगाव येथील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत चिपको आंदोलन करण्यात आले. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शाळेला चारही बाजूने कवटाळून, खासगी शाळा तुपाशी...सरकारी शाळा उपाशी..., आमची शाळा सुरू करा... सुरू करा... अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.सोनेगावची ही शाळा एकेकाळी सोनेगाव जुनी वस्ती, रहमतनगर, गजानन झोपडपट्टी, इंद्रप्रस्थनगर, ममता सोसायटी, शिवशक्ती ले-आऊट आदी परिसरातील चिमुकल्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा आधार होती. मात्र तीन वर्षांपूर्वी या शाळेला कायमचे कुलूप ठोकण्यात आले. त्यामुळे या भागातील गरीब पालकांना आपली मुले खासगी शाळेत टाकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मात्र रोज-मजुरीत दोनवेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने करणाऱ्या या पालकांनी खासगी शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी भरमसाट फी कुठून आणावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनपाची ही शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. नागरिक बराच वेळ शाळेला चिपकून होते. माजी नगरसेविका अ‍ॅड. रेखा बाराहाते यांच्यासह किशोर वंजारी, संजय डोईजोड आदींच्या नेतृत्वात या भागातील कुणाल शंभरकर, प्रकाश भिते, आशिष सातपुते, नीतेश मंडपे, जावेद खान, राजेश कोपरे, चंद्रकांत भाकरे, सुरेश पोहनकर, पीयूष वाकोडीकर, डॉ. प्रणीत जांभुळे, विजय काम्बे, सिंधू इंगळे, संजय भाकरे, अजय मेश्राम आदी नागरिक चिपको आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी बॅनर, पोस्टर घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.मनपाच्या शाळा मुद्दाम बंद करून प्रायव्हेट शाळांची दुकानदारी चालविली जाते. कोणत्याही परिस्थितीत ही शाळा सुरू करा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करून स्वत:च शाळा सुरू करू, असा इशारा अ‍ॅड. बाराहाते यांनी दिला. चिपको आंदोलनानंतर चिमुकल्यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. परिसरातील वस्तीत घोषणा देत जनजागृती करण्यात आली. पत्रकेही वाटण्यात आली. सोनेगाव मनपा शाळा वाचवा कृती समिती आणि सहकारनगर मनपा शाळा माजी विद्यार्थी समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.मोहल्ला सभेत घेतले विविध ठरावरॅलीनंतर शाळेच्या मैदानातच मोहल्ला सभेचे आयोजन करण्यात आले. यात विविध ठराव घेण्यात आले. बंद पडलेली सोनेगाव शाळा तातडीने सुरू करा, मैदानाला सुरक्षा भिंत उभारा, शाळेची रंगरंगोटी करा, पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी-मराठीतून शाळा सुरू करा, उत्तम शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण द्या, आदी ठरावांचा यात समावेश होता. सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीचे धीरज भिसीकर, दीपककुमार साने, दीनानाथ वाघमारे, डॉ. वासुदेव डहाके, मुकुंद अडेवार तसेच बालरक्षक प्रसेनजित गायकवाडही उपस्थित होते.नगरसेवक, अधिकारी पोहचले नाहीकृती समितीतर्फे चिपको आंदोलन व नंतर मोहल्ला सभेचे आयोजन लक्षात घेता लक्ष्मीनगर झोनमधील सहायक आयुक्त, झोन सभापती आणि प्रभाग ३६ मधील चारही नगरसेवकांना मोहल्ला सभेचे पत्र देण्यात आले, मात्र ते उपस्थित झाले नाहीत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जर शाळेच्या प्रश्नांवर वेळ नसेल तर त्यांना मतदार पुढील निवडणुकीत आपली जागा दाखवतील, असा इशाराही सहभागी नागरिकांनी दिला.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलनSchoolशाळा