आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची साईट सुरू

By Admin | Updated: August 12, 2016 02:42 IST2016-08-12T02:42:48+5:302016-08-12T02:42:48+5:30

वाहन परवान्यासाठी आवश्यक असलेले ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’ची साईट गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठप्प होती.

Start the online appointment site | आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची साईट सुरू

आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची साईट सुरू

आयुक्तांनी दिल्या सूचना : तीन महिन्यांची प्रतीक्षा कायम
नागपूर : वाहन परवान्यासाठी आवश्यक असलेले ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’ची साईट गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठप्प होती. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच स्वत: परिवहन आयुक्तांनी याची दखल घेतली. संबंधित विभागाला याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. परिणामी, बुधवारपासून ही साईट सुरळीत झाली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी राज्यभरात वाहन परवान्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’ योजना सुरू करण्यात आली. परंतु याला दोन वर्षे होऊनही योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पक्क्या परवान्याच्या अपॉर्इंटमेन्टसाठी उमेदवाराला आजही तीन महिन्यानंतरची तारीख मिळत आहे. आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घेण्यासाठी उपलब्ध असलेले ‘सारथी डॉट नीक डॉट इन’ हे संकेतस्थळ दोन-तीन दिवसांपासून ठप्प पडले होते. परिणामी, वाहनधारक अडचणीत आले होते. ‘लोकमत’ने १० आॅगस्टच्या अंकात ‘वाहन परवान्याच्या अपॉर्इंटमेन्टची साईट ठप्प’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतली. त्यांनी हे संकेत स्थळ चालविणाऱ्या ‘एनआयसी’ला या संदर्भात ‘स्पीड वाढविण्याची’ सूचना केली. या सूचनेमुळे बुधवारी ही साईट पूर्ववत झाली. परंतु तीन महिन्यांची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. गेडाम यांनी यात लक्ष घालून ही प्रतीक्षा यादी कमी करण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Start the online appointment site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.