शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘लोडशेडिंग’ला सुरुवात : दसऱ्याच्या तोंडावर राज्यात वीजसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 20:53 IST

ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून विजेचा पुरवठा वाढल्यानंतर राज्यात २४ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यात अडीच हजार मेगावॅट विजेची कमतरता, अपुऱ्या पावसाचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून विजेचा पुरवठा वाढल्यानंतर राज्यात २४ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.अपुऱ्या पावसामुळे राज्यात कृषिपंपांकडून विजेची मागणी वाढली आहे. मुंबई वगळता उर्वरित राज्यात सद्यस्थितीत १९ हजार ५०० मेगावॅट विजेची आवश्यकता आहे; तर प्रत्यक्षात वीजपुरवठा हा १७ हजार मेगावॅटच्या आसपासच होत आहे. त्यामुळेच जास्त वीजहानी असलेल्या ठिकाणी कपात करावी लागत आहे. ‘जी-१’ (वीजहानी ५८ ते ६६ टक्के), ‘जी-२’ (वीजहानी ६६ ते ७४ टक्के) व ‘जी-१’ (वीजहानी ७४ टक्क्यांहून अधिक) येथे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात करण्यात आली आहे.मागील दोन ते तीन दिवसांत विजेच्या मागणीमध्ये एक हजार मेगावॅटची वाढ झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे ही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकांसाठी कृषिपंपांवर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे विजेचे उत्पादनदेखील प्रभावित झाले आहे. ‘महाजेन्को’च्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये आवश्यक प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत नसल्याने उत्पादनाला फटका बसला आहे. परळी वीज केंद्रातील तीन, भुसावळ, कोराडी, खापरखेडा येथील प्रत्येकी दोन तर नाशिक व चंद्रपूर वीज केंद्रातील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. कोयनेवरील वीज प्रकल्पाला पाण्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी सुस्त करण्यात आले आहे. ‘पॉवर एक्सचेंज’मध्ये विजेचे सरासरी दर १०.६५ रुपये प्रति युनिट इतके झाले आहेत. त्यामुळे वीज खरेदीमध्येदेखील अडचणी येत आहेत. राज्याला केंद्रीय ‘ग्रीड’ व खासगी वितरकांच्या भरवशावर राहावे लागत आहे.स्रोत                उपलब्धता (‘मेगावॅट’मध्ये)सेंट्रल ग्रीड          ४,७९०महाजेन्को          ५,३१५गॅस प्रकल्प        २६७कोयना             १,१५६अदानी             २,५५७रतन                २७०जेएसडब्लू       २८३पवन ऊर्जा       १७७सौर ऊर्जा        ५२८

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन