पूर ओलांडताना दाेघे वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST2021-07-09T04:08:01+5:302021-07-09T04:08:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : नदीतील रपट्यावरून (छाेटा पूल) पुराचे पाणी वाहत असताना दाेघांनी पूर ओलांडण्याचे धाडस केले आणि ...

पूर ओलांडताना दाेघे वाहून गेले
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : नदीतील रपट्यावरून (छाेटा पूल) पुराचे पाणी वाहत असताना दाेघांनी पूर ओलांडण्याचे धाडस केले आणि वाहून गेले. दाेघेही शेतकरी आहेत. नागरिकांनी त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. बचाव पथकाने शाेध सुरू केला असून, सायंकाळपर्यंत त्यांनाही यश आले नव्हते. ही घटना कळमेश्वर तालुक्यातील गाेवरी शिवारात गुरुवारी (दि. ८) दुपारी घडली.
अण्णाजी पुरुषोत्तम निंबाळकर (५२) व प्रवीण ऊर्फ गुड्डू मधुकर शिंदे (४२) दाेघेही रा. गाेवरी, ता. कळमेश्वर अशी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. ते दाेघेही एमएच-४०/क्यू-१०३३ क्रमांकाच्या माेटरसायकलने शेतीला लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कळमेश्वरला गेले हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. परतीच्या प्रवासात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कळमेश्वर-गाेवरील मार्गावरील गाेवरी नदीला पूर आला हाेता.
या दाेघांनीही माेटरसायकल राेडच्या बाजूला उभी करून नदीतील रपट्यावरून पूर ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि खाेली याचा अंदाज आला नाही. त्यातच तेज प्रवाहामुळे त्यांचा ताेल गेला आणि दाेघेही प्रवाहात वाहत गेले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तहसील प्रशासनाला सूचना देत दाेघांचाही शाेध घ्यायला सुरुवात केली. माहिती मिळताच बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही नदीच्या तीराने त्यांचा शाेध घेतला. मात्र, दाेघांचाही थांगपत्ता लागला नाही. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले असून, शुक्रवारी (दि. ९) सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली.
...
उंच पुलाची गरज
कळमेश्वर-पाटणसावंगी (ता. सावनेर) मार्ग गोवरी, खैरी, तोंडाखैरी, सिल्लोरी, बेलोरी, पारडी, वलनी, खंडाळा या गावांना जाेडला असून, या मार्गाने या गावांमधील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांची सतत रहदारी आहे. गाेवरी नदीचा प्रवाह तेज असून, त्यावरील पूल हा फारच कमी उंचीचा आहे. पुरामुळे या गावांचा वारंवार संपर्क तुटत असल्याने तसेच पूर ओलांडणे धाेकादायक असल्याने या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे.