अमरावती विभागात ५६ मार्गांवरील एसटी वाहतूक ठप्प
By Admin | Updated: July 24, 2014 00:54 IST2014-07-24T00:54:17+5:302014-07-24T00:54:17+5:30
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती विभागात जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी एसटी महामंडळालाही पावसाचा फटका बसला. अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडले.

अमरावती विभागात ५६ मार्गांवरील एसटी वाहतूक ठप्प
एसटीला फटका : पावसामुळे जनजीवन विस्कळीत
अमरावती : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती विभागात जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी एसटी महामंडळालाही पावसाचा फटका बसला. अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडले. काही रस्त्यांवर नदी- नाले तुडूंब भरुन वाहत होते. जीवित हानी होऊ नये म्हणून विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील ४०, अकोला- वाशीम १५ व यवतमाळ जिल्ह्यातील एका मार्गाचा समावेश आहे. हे मार्ग बंद करण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. मंगळवारच्या मुसळधार व वादळी पावसाने संपूर्ण विभागालाचा झोडपून काढले. पावसामुळे अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते.
अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. जीवित हानी टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने अमरावती विभागातील ५६ मार्गांवरील एसटी वाहतूक बुधवारी सकाळपासूनच बंद केली होती. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा- वायगाव, दर्यापूर- अकोट, दर्यापूर - भातकुली, अमरावती- शिरजगाव, अमरावती- चांदूरबाजार, चांदूररेल्वे- धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे-तिवसा, चांदूररेल्वे- नांदगाव-भिलटेक, चांदूररेल्वे- गव्हा फरकाळे, चांदूररेल्वे- धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी-पळसखेड, कुऱ्हा- अमरावती, चांदूररेल्वे- आर्वी, वरुड- नागपूर, आर्वी-राजुरा, लोणी- काचुर्णा, वरुड- पांढुर्णा, अमरावती- नागझरी, चांदूरबाजार- अमरावती, चांदूरबाजार- परतवाडा, चांदूरबाजार - देऊरवाडा, चांदूरबाजार- बेलोरा, चांदूरबाजार- आसेगाव, चांदूरबाजार- आसेगाव, चांदूरबाजार -तळेगाव, चांदूरबाजार- ब्राम्हणवाडा, चांदूरबाजार- मोर्शी, मोर्शी- परतवाडा, मोर्शी- तिवसा, मोर्शी- काटोल, मोर्शी- आर्वी, मोर्शी- तिवसा, परतवाडा- चांदूरबाजार, परतवाडा- अकोला, परतवाडा- अमरावती, परतवाडा- धारणी, सेमाडोह, परतवाडा-शिरजगाव, अकोला-वाशिम जिल्ह्यातील अकोला- अकोट, अकोट- परतवाडा, अकोला- मांजोळ वाडेगाव, अकोला- लोगाग्राम, अकोला- नवथळ, अकोला- म्हैसांग, अकोला- गोरेगाव, अकोला- पिंजर, मंगरुळपीर-गोसा पिंपळखुटा, रिसोड- झनक मेहकर, तेल्हारा- जळगाव, मूर्तिजापूर- कामरगाव धनज, मूर्तिजापूर-भातकुली, यवतमाळ जिल्ह्यातील रोळेगाव- नागपूर मार्गांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)