नागपुरात एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:25 IST2018-03-03T19:24:52+5:302018-03-03T19:25:07+5:30
व्यसनाधिनतेमुळे नैराश्य आल्याने राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) एका जवानाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हिंगणा मार्गावरील राज्य राखीव दलाच्या वसाहतीतील ७९/०१ सहनिवासात हा प्रकार घडला.

नागपुरात एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यसनाधिनतेमुळे नैराश्य आल्याने राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) एका जवानाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हिंगणा मार्गावरील राज्य राखीव दलाच्या वसाहतीतील ७९/०१ सहनिवासात हा प्रकार घडला.
विश्वास शामराव मडावी असे जखमी जवानाचे नाव आहे. तो राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक १३ मध्ये कार्यरत आहे. तो व्यसनाधिन झाला असून, त्यामुळे त्याचे कुटुंबीयदेखील त्याला सोडून निघून गेले आहे. तो एकटाच घरी राहतो. कर्तव्यावरही जात नाही. सध्या तो आजारी रजेवर आहे. शुक्रवारी सर्वत्र धुळवड साजरी होत असताना मडावी दिवसभर त्याच्या घरात एकटाच होता. अनेक दिवसांच्या एकाकीपणामुळे त्याला कमालीचे नैराश्य आले होते. तो दुसºयांसोबत फारसा बोलत नव्हता. या अवस्थेत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने धारदार शस्त्राने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजाºयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूची मंडळी जमविली. राज्य राखीव दलाचे वरिष्ठ आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. मडावीला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करून घेण्यात आले. डॉक्टरांनी तो धोक्याबाहेर असल्याचे रात्री स्पष्ट केले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी प्रेमकुमार काशीनाथ मिश्रा यांच्या तक्रारीवरून मडावीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.