श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 22:39 IST2022-02-24T22:38:54+5:302022-02-24T22:39:19+5:30

Nagpur News भारतातील श्रीलंका दूतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

Sri Lankan High Commissioner visits team headquarters | श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट

श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट

नागपूर : भारतातील श्रीलंका दूतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

ते गुरुवारी सकाळी नागपुरात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर मोरागोडा यांनी महाल येथील संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरसंघचालकांशी विविध सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर श्रीलंकन उच्चायुक्तांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली व डॉ. हेडगेवार तसेच गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचेदेखील दर्शन घेतले. या भेटीदरम्यान मोरागोडा यांनी सरसंघचालकांना ऐतिहासिक केलानिया मंदिरातील अर्हत महिंदा आणि संघमित्ता थेरुनी यांच्या प्रतिमा भेट म्हणून दिल्या.

Web Title: Sri Lankan High Commissioner visits team headquarters