मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:38 IST2019-01-11T00:37:52+5:302019-01-11T00:38:41+5:30

हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.

Spread network in many cities of the Maya | मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क

मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क

ठळक मुद्देहॉटेल ‘रेडिसन ब्लू’ प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या एसएसबीने सोमवारी रात्री हॉटेल रेडिसन ब्लू येथील खोली क्रमांक २०२ मध्ये धाड टाकून मायाला पकडले होते.
तसेच कोलकाता येथ्थील एक तरुणीही सापडली होती. ती मायाच्या बोलावल्यावर ३० डिसेंबर रोजी नागपूरला आली होती. ती सीताबर्डी येथील हॉटेल हरदेव येथे थांबली होती. नंतर मायाने तिला हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये थांबवले होते. पोलिसांना अनेक दिवसंपासून हॉटेलमध्ये देह व्यापर चालत असल्याची माहिती होती. यात माया सक्रिय असल्याची माहितीही पोलिसांना लागली होती. माया इंटरनेटच्या माध्यमातून देह व्यापाराचा धंदा करते. पोसिांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून मायाशी संपर्क साधून तरुणीचा सौदा केला. यानंतर हॉटेल ‘रेडिसन ब्लू’मध्ये धाड टाकून मायाला पकडण्यात आले.
सूत्रानुसार माया पहिल्यांदा २०१६ मध्ये चेन्नई येथे देह व्यापार करतांना पकडल्या गेली होती. यानंतर तिला १६ नोव्हेंबर रोजी सदर छावणी येथ पकडण्यात आले. त्यावेळी मायाकडे दिल्ली येथील तरुणी सापडली होती. माया अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे. ती देह व्यापारात असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांमधील तरुणींच्या दलालाशी जुळलेली आहे. त्यांच्या माध्यमातून माया नियमितपणे बाहेरच्या शहरातून तरुणी करारावर येथे बोलवत असते. हा करार १० ते १५ दिवसांचा असतो. दोन-तीन विसात ग्राहक न आल्यास हा करार वेळेच्या अगोदर तोडून तरुणीला परत पाठवले जाते. मायाच्या ग्राहकांमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची संख्या अधिक आहे. ते बाहेरच्या तरुणींची मागणी करतात. यामुळे माया इतर शहरांमधून तरुणी बोलावते. मायाचे म्हणणे आहे की, स्थानिक तरुणीकडून देह व्यापार केल्यास पोलिसांच्या धोक्यासह इतर अनेक प्रकारचा त्रासाचा सामना करावा लागतो.

Web Title: Spread network in many cities of the Maya