रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:56+5:302021-07-17T04:07:56+5:30
भिवापूर/बेसूर/कन्हान : ‘लोकमत रक्ताचं नात’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यास नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यात ...

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिवापूर/बेसूर/कन्हान : ‘लोकमत रक्ताचं नात’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यास नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. शुक्रवारी भिवापूर तालुक्यातील बेसूर आणि पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीत रक्तदात्यांनी स्वंयस्फूर्त सहभाग नोंदवीत राष्ट्रीय कार्यात सहकार्य केले.
शिवसेना शाखा, बेसूर
लोकमत व शिवसेना शाखा बेसूरच्या संयुक्त विद्यमाने बेसूर येथील समाजभवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच स्नेहा चावट, बाजार समितीचे सभापती विठ्ठल राऊत, भाजप नेते भास्कर येंगळे, तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, पोलीस पाटील अमित राऊत, शिक्षक मधुकर आंबेकर, युवक काँग्रेसचे महासचिव चेतन पडोळे, श्रेयश जयस्वाल, सुनील शिवरकर, प्रीतेशजी आमले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वत्र रक्ताचा तुटवडा असताना लोकमतने राज्यभर चालविलेली रक्तदानाची मोहीम ही राष्ट्रीय सेवाकार्य असल्याचे प्रतिपादन सरपंच स्नेहा चावट यांनी केले. तालुका प्रमुख संदीप निंबार्ते यांनी या मोहिमेचे कौतुक करीत लोकमत रक्ताचं नातं जपणारं वृत्तपत्र असल्याचे सांगितले. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ही मोहीम महत्त्वाकांक्षी असल्याचे मत भास्कर येंगळे यांनी व्यक्त केले. चेतन पडोळे यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व संचालन तालुका प्रतिनिधी शरद मिरे यांनी तर आभार वार्ताहार जितेंद्र धोटे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनेश सेलोटे, दिलीप बेंभारे, रोशन भगत, वैभव सहस्रबुद्धे, चेतन आंबुलकर, नीतेश लामसोंगे, सुशील गजभे, कार्तिक मस्के, रवी राकस, सुधाकर पुरामे, नीलेश राजूरकर, शुभम वर्मा, निशांत लोहाट, सूरज वैद्य, अतुल बांगरी, नागेश वाकडे, आशिष राऊत, शरद मोरे, आशिष गणवीर, अमित कुबरे, विशाल सायसे, रमेश शहारे, हरिहर लेदाडे, सूरज आडे, शुभम गंधरे, शैलेश गंधरे, अक्षय वाढई, निखील उरकुडे, योगेश मुंघाटे, सूरज नरुले, राहुल कोडापे, रोशन वाढई, रोशन डंभारे, विक्की कुबडे, रोहित वैद्य, शुभम सेलोटे, अनिकेत वैद्य, सूरज दहाघने, अजित पठाण, आकाश पिंपळकर, सचिन शेंडे आदींनी परिश्रम घेतले.
--
नांद, महालगाव, चिखलापार येथील रक्तदाते
बेसूर या छोट्याशा गावात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात बेसूरसह नांद, महालगाव, पांजरेपार, पिरावा, नाड, चिखलापार आदी गावातील तरुण रक्तदान करण्यासाठी स्वेच्छेने शिबिरस्थळी दाखल झाले होते. महालगावचे पोलीस पाटील अमित राऊत व सालेभट्टी (दंदे) येथील पोलीस पाटील पुरुषोत्तम नवघरे यांनीसुद्धा रक्तदान केले.
---
स्व. गोपाळराव डोणेकर जनसेवा प्रतिष्ठान, कन्हान
स्व. गोपाळराव डोणेकर जनसेवा प्रतिष्ठान, कन्हान व लोकमतच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथील डोणेकर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तीत कन्हान परिसरातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. कन्हानचे माजी सरपंच कैलास भिवगडे, जुनी कामठीचे सरपंच राहुल ढोके, माजी नगरसेविका वैशाली डोणेकर, खिमेश बढिये, भूषण इंगोले, शेषराव बावणे, नीलेश गाढवे, पिंटू चरडे उपस्थित होते. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आपले रक्त हे इतरांचे प्राण वाचवू शकते. म्हणूनच रक्तदान करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन शरद डोणेकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या अर्चना नानोटे, सौरभ डोणेकर यांनी सहकार्य केले.
160721\img_20210716_112709.jpg
कन्हान