शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:31 IST

Nagpur : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीमहाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे. तर नरखेडमध्ये भाजप विरोधातील आघाडीला पाठबळ दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष ९ जागा लढत असून यापैकी ७ शहरात काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले आहेत.

रामटेकमध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजपला तगडी टक्कर देण्याची तयारी केली आहे. येथे शिंदेसेनेकडून विकेंद्र महाजन रिंगणात आहेत. खाप्यात भाजपचे बंडखोर खेमराज बारापात्रे यांना शिंदेसेनेने गळाला लावत उमेदवारी दिली आहे. शिंदेसेनेने कळमेश्वरात बिरजू रघुवंशी यांना, वर्दराज पिल्ले (कन्हान पिपरी), दुर्गा नरेश देवगडे, (वानाडोंगरी) शालिनी सोनटक्के (उमरेड) रवी त्रिपाठी (वाडी), प्रकाश हुमने (बिडगाव तरोडी), सुनीता प्रकाश डोमकी (पारशिवनी), संगीता रघुनाथ गायकवाड (बहादुरा), मंगला डडमल (भिवापूर), प्रीती प्रकाश आजादे (गोधनी) व बेसा येथे स्वाती प्रवीण देठे यांना रिंगणात उतरविले आहे.

नरखेड येथे नगर विकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित गुप्ता यांना काँग्रेस व शिंदेसेनेने मदतीचा हात दिला आहे. यामुळे भाजपचे मनोज कोरडे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. फक्त कांद्री कन्हान येथेच शिंदेसेनेने भाजपसोबत युती केली आहे. येथे भाजपचे सुजित पानतावणे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकूण ९ जागांवर लढत आहे. यापैकी ७ठिकाणी त्यांचा सामना काँग्रेसशी होत आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) मोहप्यात हरिओम नेरकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वैशाली विकास गणवीर (वानाडोंगरी), शीतल संजय राऊत (कोंढाळी), मृणाल तिघरे (मौदा), माधुरी तुमडाम (भिवापूर), अर्चना प्रवीण मंडपे (महादुला), भारती गोवर्धन प्रधान (नीलडोह) येथे उमेदवार आहेत.

दादांची राष्ट्रवादी ८ शहरांत भाजपविरोधात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ८ शहरांमध्ये स्वबळावर लढत असून या आठही ठिकाणी त्यांनी भाजप विरोधात उमेदवार दिले आहेत. फक्त मौदा नगरपंचायतीमध्ये भाजपला समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार) मोवाड येथे प्रतिभा साहेबराव ढोके यांना उमेदवारी दिली आहे. कन्हान-पिपरीमध्ये भाजप बंडखोर मनोहर पाठक यांनाच प्रवेश देत भाजपला आव्हान दिले आहे. याशिवाय वैशाली गोपाल घटे (सावनेर), सोनाली प्रकाश लारोकर (वानाडोंगरी), संगीता नरेंद्र मेश्राम (डिगडोह देवी), गौरीशंकर रावत (वाडी) व गणेश पानतावणे यांना कांद्री कन्हानमध्ये मैदानात उतरविले आहे.

रामटेकमध्ये उद्धवसेना नाही

उद्धवसेना एकूण ८ शहरांत लढत आहे. यापैकी ६ शहरांत काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. मात्र, रामटेक हा आमचा गड आहे असे वारंवार मुंबईतून सांगणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात रामटेक नगरपरिषदेत कुणालाच मशाल घेऊन लढाईत उतरविलेले नाही. शिवाय अद्याप येथे कुणाला पाठिंबाही जाहीर केलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in Mahayuti, Mahavikas Aghadi Coalitions; Shinde Sena Challenges BJP.

Web Summary : Local elections reveal rifts in Maharashtra's alliances. Shinde Sena challenges BJP in 13 areas, while NCP (Sharad Pawar) opposes Congress in 7 cities. Ajit Pawar's NCP backs candidates against BJP in 8 cities, signaling widespread discord.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेnagpurनागपूर