ंपेटला क्र ांतीचा वणवा!
By Admin | Updated: August 9, 2015 02:52 IST2015-08-09T02:52:36+5:302015-08-09T02:52:36+5:30
इंग्रजांविरु द्ध पेटलेल्या नागरिक ांनी संतप्त होत वॉक र रोड पोलीस चौकीला आग लावली, सिटी क ोतवाली पोलीस स्टेशनवर दगडफेक के ली.

ंपेटला क्र ांतीचा वणवा!
९ आॅगस्ट १९४२ रोजी अख्खे नागपूर उतरले रस्त्यांवर
नागपूर : इंग्रजांविरु द्ध पेटलेल्या नागरिक ांनी संतप्त होत वॉक र रोड पोलीस चौकीला आग लावली, सिटी क ोतवाली पोलीस स्टेशनवर दगडफेक के ली. इंग्रजांविरु द्धचा जोश जाळपोळीने व्यक्त व्हायला लागला. ९ आॅगस्टपासून सुरू झालेले हे आंदोलन आठवडाभर चालले. या घटनेला आज ७३ वर्षे पूर्ण होत आहेत, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नागपूरने घेतलेला पुढाक ार क दापिही विसरता येणे शक्य नाही.
नागपूरच्या रस्त्यारस्त्यांवर आबाल वृद्ध एक त्रित झालेले...चले जाव आणि महात्मा गांधी क ी जयचे नारे...हातात तिरंगा ध्वज फ डक वित असलेले युवक आणि त्यांच्या मागे हजारो देशभक्तांचा समूह...टिळक पुतळा, बडक स चौक , इतवारी चौक ,गांधी गेट, हंसापुरी, गांजाखेत, तांडापेठ, जागनाथ बुधवारी आदी प्रत्येक चौक ात देशभक्त नागरिकांच्या गर्दीने वाहतूक खोळंबली. इंग्रज या आंदोलनाने गोंधळून गेले. परिस्थिती हाताबाहेर जात होती अन् त्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती पोलिसांची नव्हती. अखेर क ामठीतून लष्क राला पाचारण क रण्यात आले. महात्मा गांधींनी के लेल्या आवाहनाला नागपुरात लाभलेला हा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद होता. नागपुरात पेटलेल्या क्र ांतीच्या वणव्याने इंग्रजांचे धाबे दणाणले. महात्मा गांधींनी गोवालिया टँक वरू न इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिला आणि देशभरातील क ार्यक र्ते विद्युल्लतेच्या वेगाने पेटून उठले. म. गांधी यांच्या आवाहनाला मिळणारा प्रतिसाद पाहता इंग्रजांनी ८ आॅगस्टला रात्री महात्मा गांधी यांना अटक के ली. नागपुरात ही बातमी रेडिओ जपानमुळे क ळली आणि ९आॅगस्टला सक ाळपासून नागपूरच्या रस्त्यावर लहान मुले, युवक ांसह वृद्धांनीही स्वातंत्र्याचा जयघोष के ला. हा नागरिक ांनी देशप्रेमासाठी के लेला देशभक्तीचा उत्स्फू र्त जागर होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी के लेला हा यशस्वी हुंक ारच होता. मुळात हे आंदोलन चिघळू नये म्हणून इंग्रजांनी नागपुरातील पहिल्या फ ळीतील नेत्यांना अटक के ली होती पण दुसऱ्या फ ळीतील नेत्यांनी, लाल सेनेच्या सैनिक ांनी पुढाक ार घेत देशभक्तीचे स्फु ल्लिंग नागपुरात चेतविले आणि नागरिक ांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मुंबई अधिवेशनावरून परत येत असलेल्या जनरल आवारी आणि दीनदयाल गुप्ता यांना जळगाव आणि नाशिक येथेच अटक क रण्यात आली. त्यावेळी कु णी आवाहन के ल्याशिवायच नागपूरची संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. इंग्रजांनी क र्फ्यु लावला. क ाँग्रेसच्या सर्व संघटनांवर बंदी घालण्यात आली पण आंदोलन क मी होण्यासाठी त्याचा क ाहीही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)
स्वातंत्र्याचा एकच जयघोष : करो या मरो
९ आॅगस्ट १९४२ हा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीतील एक धगधगता दिवस. अख्खे नागपूर देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्र ांतीचा बिगूल फुं क ते झाले. नागपुरात या दिवशी इंग्रजांचे राज्य नव्हतेच. युनियन जॅक नावालाच फ डक त होता. इंग्रजांना लोक ांच्या मनातील स्वातंत्र्याचा जाज्वल्य हुंक ार दडपून टाकता आला नाही. नागपुरातील नागरिक अक्षरश: रस्त्यांवर उतरले होते. रस्त्यारस्त्यांवर वाहतुक ीचा खोळंबा झालेला होता. रस्त्यांवर झाडे क ापून टाक ली होती, विजेच्या व टेलिफ ोनच्या तारा तोेडण्यात आल्या होत्या. अखेर नागपूरचे तत्क ालीन जिल्हाधिक ारी लेयार्ड यांनी नागपुरात क र्फ्यू लावला. पण इंग्रजांनी लावलेल्या या क र्फ्यूने आंदोलनावर परिणाम झाला नाही. लोक अधिक पेटून उठले. पुढील जवळपास आठवडाभर नागपूर हे क ाँग्रेस क ार्यक र्ते व लालसेनेच्या हवाली होते. या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अखेर क ामठीहून लष्क राला पाचारण क रावे लागले. जाज्वल्य देशभक्ती संचारलेल्या नागरिक ांनी मात्र लष्क रालाही जुमानले नाही. निधड्या छातीने अनेक क्र ांतिक ारक बंदुक ीच्या गोळ्यांना देशासाठी सामोरे गेले. मुंबईतील गोवालिया टँक वरू न महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिल्यानंतर साऱ्या देशात त्याचे प्रतिध्वनी उमटले. ९ आॅगस्ट १९४२ रोजी झालेले आंदोलन अचानक झाले नव्हते. महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये सेवाग्राम आश्रम स्थापन के ल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याची सारी सूत्रे या आश्रमातून हलत होती. देशातील सारे नेते सेवाग्रामला येत होते. जुलै १९४२ मध्ये वर्धा येथे अ.भा. क ाँग्रेस समितीच्या (एआयसीसी) क ार्यक ारिणीची बैठक झाली. या बैठक ीत इंग्रजांना भारत छोडोचा इशारा देण्याचा ठराव संमत क रण्यात आला. या आंदोलनाची सुरु वात मुंबईतून करण्याचे ठरले. यासाठी ८ आॅगस्टला मुंबईतील गोवालिया टँक वर क ाँग्रेसचे अधिवेशन आयोजित के ले होते. देशाचे सारे लक्ष या अधिवेशनाक डे लागले होते. नागपुरातील स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे लक्षही त्याक डे होते. क ाँग्रेसच्या या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी जनरल मंचरशा आवारी, नागपूर शहर क ाँग्रेस समितीचे अध्यक्ष दीनदयाल गुप्त, आचार्य व्ही.एस. दांडेक र आदी नेते मुंबईला गेले होते. महात्मा गांधी यांनी गोवालिया टँकवरू न इंग्रजांना ‘चले जाव’चा इशारा दिला. आंदोलनाचे आवाहन क ार्यक र्त्यांना के ले. अन् म. गांधीच्या आवाहनाने सारा देश आंदोलनाने पेटला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी. तेव्हा क ार्यक र्त्यांनी विचारले हे आंदोलन क से क रायचे? महात्मा गांधी उत्तर दिले ‘क रा किं वा मरा’. या तीन शब्दांनी क ार्यक र्त्यांना स्फु रण चढले. इंग्रजांनी ८ आॅगस्टला रात्री महात्मा गांधी यांना अटक के ली. नागपुरात ही बातमी रेडिओ जपानमुळे क ळली आणि नागरिक ांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यापाठोपाठ क ाँग्रेसशी संबंधित साऱ्या संघटनांवर बंदी घालण्यात आली. नागपूर शहर क ाँग्रेस समिती, राष्ट्रीय युवक संघ, लालसेनेसह ६१ संघटनांवर इंग्रजांनी बंदी घातली. या क ार्यालयांना सील ठोक ण्यात आले. नागपुरातही अटक सत्र सुरू झाले. शुक्ल मंत्रिमंडळातील मंत्री सी.जे. भरु क ा यांना अटक क रण्यात आली. मगनलाल बागडी यांच्यासह अनेक ांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यासोबत मगनलाल बागडी यांच्यासह अनेक जण भूमिगत झाले. यामुळे लोक ांच्या असंतोषामध्ये आणखी भर पडली. मुंबईत अधिवेशनाला गेलेले नेते जनरल आवारी, दीनदयाल गुप्त यांना नागपुरात परत येताना इंग्रजांनी जळगाव व नाशिक येथेच अटक के ली व तुरुं गात डांबले. त्यामुळे पहिल्या फ ळीतील नेते नागपुरात राहिले नव्हते. पण तरीही हे आंदोलन नागपुरात के वळ देशभक्त नागरिक ांच्या भरवशावर यशस्वी झाले.
आॅगस्ट क्रांती दिन
महिलांनी आणले बॉम्बचे सामान
महात्मा गांधी यांनी भारतीय महिलांना उंबरठा ओलांडून स्वातंत्र्य संग्रामात ओढले. त्याचा परिणाम नागपुरातही झाला होता. नागपुरातील अनेक महिलांनी या आंदोलनात भाग घेतला. अनसूयाबाई क ाळे, विद्यावती देवडिया, रमाबाई तांबे, दुर्गा वझलवार, दलेरबेन आवारी अशा कि तीतरी महिलांनी या लढ्यात भाग घेतला. मंचारशा आवारींना आधीच अटक झाली होती. दलेरबेन आवारींनाही पोलिसांनी अटक के ली. त्यांची दोन लहान मुले दस्तुर नावाच्या पारशी कु टुंबाक डे राहिली. एवढेच नव्हे तर बॉम्ब पथकातही नागपुरातील जांबाज महिला होत्या. बॉम्ब तयार क रण्याचे साहित्य मुंबईतून नागपुरात आणण्याची जबाबदारी सुमती शेर्लेक र यांच्यावर होती. संपूर्ण शेर्लेक र कु टुंबाने स्वातंत्र्य संग्रामात लढ्यात भाग घेतला होता. यासाठी शांताबाई माडखोलक र यांनी साहाय्य के ले होते. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेविक ा व मातृसेवा संघाच्या संस्थापक क मलताई होस्पेट यांचेही मोठे योगदान आहे. भूमिगत झालेल्या स्वातंत्र्यवीरांना आश्रय देण्याचे तसेच भूमिगतांच्या माध्यमातून सरक ारच्या विरोधातील पत्रे, निवेदने या सूतिक ागृहातून चालत होती.
शहीद शंक र महालेंना फ ाशी
लालसेनेचे मुख्य क ार्य सरक ारी खजिना लुटणे, दारु गोळा लुटणे, सरक ारी क ार्यालयांना आगी लावण्याचे होते. इंग्रज प्रशासनाची क ोंडी क रणे हेच त्यांचे ध्येय होते. नबाबपुरा चौक ी लुटण्याचा प्रयत्न क रीत असताना २१ वर्षीय शंक र महाले पोलिसांच्या हातात लागला. पुढे या युवक ाला इंग्रजांनी फ ाशी दिली व तो शहीद शंक र महाले झाला.