शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

हेच आहे का नागपूरकरांचे ‘स्पिरीट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 10:58 IST

मंगळवारी सकाळी मोक्षधाम नजीकच्या सरदार वल्लभभाई पटेल चौकात एका भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली.

ठळक मुद्देअपघातग्रस्त महिलेचा मदतीसाठी टाहोसहकार्य करण्याऐवजी लोक बनले केवळ मूकदर्शक

संजय लचुरिया।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील सरदार वल्लभभाई पटेल चौक...वेळ सकाळी ९.३२ ची. कार्यालयात जाण्याची वेळ असल्याने चाकरमान्यांची लगबग सुरू होती. अचानक वेगात एक कार येते अन् डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दुचाकीस्वार महिलेला समोरून धडक देते. मोठ्या आवाजामुळे सर्वांचेच लक्ष जाते अन् दिसते रस्त्यावर वेदनेने विव्हळत पडलेली महिला. तिच्याभोवती घोळका जमा होतो पण मदतीसाठी कुणीही पुढे येत नाही. ‘कोणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स बोलवा’, ‘गाडीला थांबवा’ अशा सूचना देण्यासाठी पुढाकार घेतात, पण जखमीला रस्त्याच्या कडेला नेण्यासाठीदेखील कुणी हात देत नाही. हे चित्र पाहून प्रश्न उपस्थित होतो की लोकांमधील माणुसकी खरोखरच हरवत चालली आहे का अन् हेच आहे का नागपूरकरांचे ‘स्पिरिट’?मंगळवारी सकाळी मोक्षधाम नजीकच्या सरदार वल्लभभाई पटेल चौकात एका भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार महिला रस्त्यावर पडली व जखमी झाली. तिला मदत करण्याचे सौजन्य न दाखविता कारचालकाने गाडी पुढे दामटली व बैद्यनाथ चौकाकडे भरधाव वेगाने निघून गेला. दरम्यान, काही तरुणांसह नागरिक जखमी महिलेजवळ जमले. महिला रक्ताच्या थारोळ्यात व चक्कर येत असलेल्या अवस्थेत असताना कुणीही मदतीचा हात दिला नाही. त्याच क्षणी तेथून जात असलेल्या प्रस्तुत प्रतिनिधीला हा प्रकार दिसला अन् गाडी थांबवत त्याने मदतीसाठी धाव घेतली. इतरांकडून केवळ सूचनाच येत होत्या. अखेर मदतीसाठी एक सायकलस्वार महिला धावली व दोघांनी मिळून जखमीला रस्त्याच्या कडेला नेले. आश्चर्याची बाब म्हणजे इमामवाडा पोलीस चौकी ही घटनास्थळापासून अगदी जवळच होती. पोलिसांना कळविण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. ‘बहुत बुरा हुआ’ अशी प्रतिक्रिया देत गर्दी शमली. परंतु ही घटना संवेदनशील व्यक्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेली.महिलेनेच दिला मदतीचा हातमहिला जखमी असताना तिला दवाखान्यात नेण्यासाठी एकानेही पुढाकार घेतला नाही. एखादी कार थांबविण्यासाठी हातदेखील दाखविला नाही. आॅटोचालकांनी ‘हमे परेशानी नहीं चाहिए’ असे म्हणत हात वर केले. अखेर एका कारचालक महिलेला हा प्रकार दिसला व तिने स्वत:हून गाडी थांबवत जखमीला दवाखान्यात नेण्यासाठी पुढाकार घेतला.१०८ क्रमांक काय कामाचा?प्रस्तुत प्रतिनिधीचा मोबाईल बंद असल्याने त्याने एका ‘दर्शक’ नागरिकाच्या मोबाईलवरून १०८ वर फोन लावला. परंतु चार वेळा फोन लावूनदेखील कुणीच उचलला नाही. अखेर पाचव्यांदा फोन लागला. परंतु त्यात विस्तृत चौकशी करण्यात आली. मोक्षधाम चौक वाडी परिसरात आहे का, अशी तिकडून विचारणा करण्यात आली. अखेर सखोल पत्ता सांगितल्यावर काही वेळातच अ‍ॅम्ब्युलन्स येईल असे सांगण्यात येईल. परंतु त्यानंतर बराच वेळ ना कुणाचा फोन आला ना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स आली.

टॅग्स :Accidentअपघात