आकड्यांची बनवाबनवी विजेचे खरे दर लपले
By Admin | Updated: June 28, 2015 02:53 IST2015-06-28T02:53:55+5:302015-06-28T02:53:55+5:30
१ जूनपासून लागू होत असलेल्या विजेच्या नव्या दरांकडे पाहून असे वाटते की, विजेच्या दरात काहीच वाढ झालेली नाही.

आकड्यांची बनवाबनवी विजेचे खरे दर लपले
आकड्यांची बनवाबनवी विजेचे खरे दर लपले
वीज महागणार : इंधन समायोजन शुल्काची पडणार भर
कमल शर्मा ल्ल नागपूर
१ जूनपासून लागू होत असलेल्या विजेच्या नव्या दरांकडे पाहून असे वाटते की, विजेच्या दरात काहीच वाढ झालेली नाही. परंतु प्रत्यक्षात तसे नसून हा आकड्यांचा लपंडाव आहे. आकड्यांची बनवाबनवी अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, खरी दरवाढ लक्षात येत नाही.
आयोगाने आपल्या आदेशात नव्या दरांची तुलना एप्रिल १५ मध्ये लागू करण्यात आलेल्या दरांशी केली आहे. त्या हिशेबानुसार जी दरवाढ झाली ती जास्त आहे, असे कुणालाच वाटत नाही. परंतु एप्रिल १५ मध्ये इंधन समायोजन शुल्क समाविष्ट करण्यात आले होते. हे शुल्क नव्या दरात समाविष्ट नाही. आयोगाच्या आदेशात हे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हा नव्या दरानुसार बिल तयार होईल तेव्हा इंधन समायोजन शुल्क त्यात जोडण्यात येईल. हे शुल्क जोडल्यामुळे बिलावर मोठा परिणाम पडतो. हे शुल्क विजेच्या खरेदीवर अवलंबून असते. महावितरणचा वीज खरेदी करण्याचा खर्च वाढल्यास हा खर्च वाढतो. त्यामुळे हे शुल्क स्थायी नसते. आयोगाने एप्रिल २०१५ पर्यंतचे दर दर्शवलेले असून त्यात हा दर लावण्यात आला आहे. ही रक्कम जोडण्यात आल्यामुळे काय परिणाम होईल, हे पाहण्यासाठी मागील तीन महिन्यांच्या दरांची माहिती असणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये घरगुती ग्राहकांनी वेगवेगळ्या श्रेणीसाठी हा दर प्रति युनिट ४९ पैशांपासून १.५० रुपये, मे महिन्यात ४९ पैशांपासून १.६० रुपये, जून महिन्यात २८ पैशांपासून १.०२ रुपये असे इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यात आले आहे. ही रक्कम वीजदरात समाविष्ट होती. आता पुढील महिन्यापासून ही रक्कम वेगळी आकारण्यात येईल. महेंद्र जिचकार यांच्या मते, आयोगाच्या सुनावणीत याचा विरोध करण्यात आला.