शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव ट्रक उलटून फेरीवाल्याचा दबून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:36 IST

स्थानिक मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा अनियंत्रित ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्याला धडकला आणि उलटला. त्या ट्रकखाली दबल्याने फेरीवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून, या घटनेमुहे महादुला येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देमहादुल्यात काही काळ तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोराडी) : स्थानिक मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा अनियंत्रित ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्याला धडकला आणि उलटला. त्या ट्रकखाली दबल्याने फेरीवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून, या घटनेमुहे महादुला येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सुनेरीलाल शिवसिंग सोनेकर (५२, रा. कन्हैया लेआऊट, महादुला, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ते रोज महादुला येथील मुख्य बाजारात सर्व्हिस रोडच्या कडेला चप्पल-जोडे दुरुस्तीचे दुकान थाटून बसायचे. दरम्यान, सकाळी एमएच-४०/डीएस-६७४३ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेऊन मंदिर टी पॉईंटकडून वीज केंद्राकडे जात होता. तो मुख्य बाजारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक सर्व्हिस रोडच्या कठड्यावर आदळला. त्यातच तो उलटला. तिथून पळणे शक्य न झाल्याने सुनेरीलाल ट्रकखाली दबल्या गेला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.अपघात होताच नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी गर्दी केली होती. शिवाय, नागपूर - सावनेर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. काहींनी गर्दीचा फायदा घेत कोळसा चोरून न्यायला सुरुवात केली ता काही मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व शुटिंग करण्यात मग्न होते. ओव्हरलोड व अनियंत्रित वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी सुनेरीलालच्या कुटुंबीयांना आर्थिक मिळण्याची तसेच अनियंत्रित ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे, कोराडी पोलीस व वीज केंद्र प्रशासनाने तात्काळ डोजर व हायड्रा बोलावून ट्रक बाजूला केला आणि सनेरीलाल यांचा मृतदेह बाजूला काढला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.दोन लाख रुपयांची मदतसुनेरीलाल हे घरातील कर्ते पुरुष होते. ते रखरखत्या उन्हात चप्प्ल, जोडे दुुरस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांना दोन मुले व मुलगी आहे. ते रोज सकाळी ७ वाजताच्या सुमारास सायकलने येथे यायचे आणि दुकान थाटायचे. नागरिकांनी मागणी विचारात घेता कोराडी वीज केंद्र प्रशासनाने मृत सुनेरीलाल यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत घेण्याची घोषणा केल्यानंतर तणाव निवळला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू