शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 20:10 IST

भिवापूर भागात चामोर्शीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देत उलटली. यात स्कॉर्पिओमधील सहापैकी चार जण गंभीर जखमी झाले. या धडकेत पुलावरील कठडे तुटले मात्र सुदैवाने अपघातग्रस्त वाहन ८० फूट खोल नदीपात्रात न पडल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देमरुनदी पुलावर अपघात; मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर भागात चामोर्शीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देत उलटली. यात स्कॉर्पिओमधील सहापैकी चार जण गंभीर जखमी झाले. या धडकेत पुलावरील कठडे तुटले मात्र सुदैवाने अपघातग्रस्त वाहन ८० फूट खोल नदीपात्रात न पडल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.राहुल श्रावण गोलाईत (२७) रा. चामोर्शी, गीतेश धर्माजी बारसागडे (२४) रा. कुरुड चामोर्शी, संदीप रघुनाथ गोलाईत (२४) रा. गोंडपिपरी, अक्षय बाबूराव पिपरे (२४) रा. चामोर्शी अशी अपघातातील जखमींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार स्कार्पिओ क्र. एम. एच. ३० ए.ए. ३७७७ हे वाहन चामोर्शी येथून भरधाव वेगात नागपूरकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय मार्गावरील भिवापूर लगतच्या मरुनदी वळण रस्त्यावर चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने पुलाच्या कठड्याला धडक दिली. नंतर हे वाहन पुलावरच उलटले. माहिती मिळताचं ठाणेदार हर्षल अ‍ेकरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक ग्रामीण रूग्णालयात व प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलविले. वाहन उलटल्यामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ठाणेदार हर्षल अ‍ेकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एएसआय दौलत नैताम करीत आहे.तो ८० फूट खोल पात्रात पडला!वाहनाने पुलावरील कठड्याला धडक दिल्यानंतर वाहनातील सहा जणांपैकी एक १८ वर्षाचा तरुण मुलगा थेट ८० फूट नदीपात्रात फेकला गेला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने तो बचावला. पात्रात फेकल्या गेल्यानंतर हा जिगरबाज तरुण नदीच्या पाण्यातून पोहत पोहत बाहेर पडला. त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी मानसिक धक्का मात्र बसल्याचे जाणवत होते.

 

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर