शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मायलेकावर भरधाव कार धडकली ; वृद्ध मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:57 IST

रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देमुलगा गंभीर : सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.सुनंदा विजय करंदीकर (वय ६६) आणि त्यांचा मुलगा अंकुश (वय २५) हे सोमवारी पेठेतील रहिवासी होय. बाजाराच्या निमित्ताने ते सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री आले होते. रात्री ११.१५ वाजता घरी जात असताना वेगात आलेल्या स्वीफ्ट कार (एमएच ३१/ ७६०२) च्या चालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मायलेकांना बाजूच्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सुनंदा करंदीकर यांना मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला शांत केले. अंकूशच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सुरू आहे.

कारचालक नशेत ? सुनंदा यांना वृद्धत्व आणि आजारामुळे अपंगत्व आले होते. त्या जास्त वेळ चालू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या घुसतच चालायच्या. गुरुवारी कामाच्या निमित्ताने त्या घराबाहेर गेल्या होत्या आणि रस्त्याने घुसत घराकडे जात होत्या. आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्यासारखा कार चालवित होता, असा संशय त्यावेळी तेथे हजर असलेल्यांनी पोलिसांसोबत बोलताना व्यक्त केला. शुक्रवारी रात्री ७ पर्यंत पोलिसांना आरोपी कारचालक सापडला नव्हता. 

दुचाकी दुभाजकावर आदळली : तरुणाचा अपघाती मृत्यूअनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित तेजराम मेश्राम (वय १८) असे त्याचे नाव आहे. तो भांडेवाडी कळमन्यात राहात होता.३१ जुलैच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास मेश्राम त्याच्या दुचाकीने दिघोरी उड्डाणपुलावरून खाली उतरत होता. दुचाकीचा वेग जास्त असल्याने उतारावरून ती अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. त्याने डोक्यात हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे मेश्रामच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याला गुरुवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू