नागपुरात गतीमंद तरुणीवर बलात्कार; शेजारच्या महिलेमुळे घटना उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 19:38 IST2021-12-23T19:38:10+5:302021-12-23T19:38:34+5:30
Nagpur News गतीमंद तरुणी एकटी घरात असल्याची संधी साधून एका नराधमाने तिच्यावर मंगळवारी रात्री पाशवी बलात्कार केला. शेजारच्या महिलेच्या नजरेस आरोपी पडल्यामुळे त्याचे पाप उजेडात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

नागपुरात गतीमंद तरुणीवर बलात्कार; शेजारच्या महिलेमुळे घटना उघड
नागपूर - गतीमंद तरुणी एकटी घरात असल्याची संधी साधून एका नराधमाने तिच्यावर मंगळवारी रात्री पाशवी बलात्कार केला. शेजारच्या महिलेच्या नजरेस आरोपी पडल्यामुळे त्याचे पाप उजेडात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
शांतीनगरात राहणारी पीडित तरुणी २० वर्षांची असून ती गतीमंद आहे. तिचे आईवडील मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर जातात. त्यामुळे ती घरीच राहते. मंगळवारी रात्री तिच्याच वस्तीत राहणारा नराधम अजय विजय बावणे (वय २०) याची तिच्यावर विखारी नजर गेली. त्याने घरात शिरून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. बाजुच्या महिलेला तो आक्षेपार्ह्य अवस्थेत घरातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे रात्री त्या महिलेने पीडित तरुणीच्या आईला हा प्रकार सांगितला. आईने मुलीला विचारणा केली असता सांकेतिक हातवारे करून पीडित तरुणीने आरोपीचे कुकर्म उघड केले. त्यामुळे बुधवारी पीडित तरुणीच्या आईने शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी बावणेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला आज दुपारी अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
---