शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विदर्भात वन्यजीव विभागात तयार होताहेत ‘स्पेशालिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:29 IST

वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोेखण्याकरिता आखण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत विदर्भात विशेषज्ञांनी सज्ज असे किमान १० शीघ्र बचाव दले स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दलांसाठी ‘स्पेशलिस्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ठळक मुद्देमानव-वन्यजीव संघर्षावर दीर्घकालीन उपाययोजनेचा भाग

सविता देव हरकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोेखण्याकरिता आखण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत विदर्भात विशेषज्ञांनी सज्ज असे किमान १० शीघ्र बचाव दले स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दलांसाठी ‘स्पेशलिस्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्प्यात गेल्या आठवड्यात वन विभागातील ५० निवडक कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण नागपुरातील वनामती येथे पार पडले. यामधून काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची छ्राननी करुन त्यांना पुढील प्रशिक्षण दिले जाईल.याशिवाय मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात प्रायमरी रिस्पॉन्स युनिट स्थापन करण्याचीही वन विभागाची योजना आहे. याअंतर्गत नागपूर विभागात गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात ३०० ठिकाणांचा शोध घेण्यात आला आहे. हे दोन्ही दल मिळून मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्याचा प्रयत्न करतील.वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी स्थानिक पातळीवर शिघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहेत. परंतु त्यात कार्यालयातील कुठल्याही कर्मचाऱ्यांचा वेळेवर समावेश केला जात असतो. शिवाय त्यांच्या कार्यप्रणालीत अनेक उणिवा असल्याचेही निदर्शनास आले आहे. या जलद बचाव गटातील अधिकारी किंवा कर्मचारी नेहमीच बदलत असल्याने त्यांच्यात परस्पर समन्वय नसतो. बेशुद्धीकरण करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि औषधांची देखभाल योग्य पद्धतीने होत नाही.गटातील सदस्यांचे नियमित उजळणी प्रशिक्षण घेतले जात नसल्याने त्यांच्यात अपेक्षानुरुप कौशल्य आणि आत्मविश्वास वृद्धींगत होत नाही. उपयोगात येणारी उपकरणे आणि साहित्याची वेळोवेळी तपासणी होत नाही. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची एखादी घटना घडल्यास त्यावर आवर घालण्यास ही पथके फारशी प्रभावी ठरत नाहीत. तेव्हा भविष्यात या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शास्रोक्त आणि पद्धतशीरपणे कर्मचाऱ्यांना सज्ज करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार असून या कामात देशविदेशातील तज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

कुणाला मिळेल शीघ्र बचाव दलात प्रवेशशीघ्र बचाव दलात सहभागी होणारा कर्मचारी अथवा अधिकारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे. अपवादात्मक परिस्थितीत एखादा कर्मचारी मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यात तरबेज आणि उत्सुक असल्यास वयाची अट शिथिल केली जाईल.प्रत्येक गटात संपूर्ण छाननीनंतर पात्र १० कर्मचाऱ्यांची निवड होईल. त्यात वाहनचालकासह १० अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू असेल.मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यास इच्छुक निसर्गप्रेमी त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनाही जलद बचाव गटात सहभागी करुन घेता येईल.व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यक अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाला सेवा देणाऱ्या पशुवैद्यकांचाही यात समावेश असेल.

मानव-वन्यजीव संघर्षाचे बळीगेल्या ५ वर्षात राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ लोक ठार.३०,६२५ गुराढोरांचा बळी. पीक नुकसानीची १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे, पिकांच्या रक्षणासाठी कुंपणावर सोडण्यात येणाऱ्या वीज प्रवाहाच्या धक्क्यात वर्षभरात ७ वाघांचा मृत्यू.मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रणाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणाने सज्ज शीघ्र कृती दल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पहिल्या टप्प्यात ५० निवडक कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम अशा कर्मचाऱ्यांना निवडून सक्षम कृती दल स्थापन केले जातील. ही पथके कायमस्वरुपी राहणार असून मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्यात महत्त्वाची जबाबदारी वठविणार आहेत.-ए.के. मिश्राप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

विदर्भातील १० शीघ्र बचाव दले असलेले प्रकल्पपेंच-बोर व्याघ्र प्रकल्पनागपूर विभागपांढरकवडा वनविभागा व वन्यजीव विभागताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचंद्रपूर विभागब्रह्मपुरी वनविभागमेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीअमरावती विभागनवेगाव-नागझिरा, व्याघ्र प्रकल्प, गोंदियाभंडारा व गोंदिया विभाग

टॅग्स :wildlifeवन्यजीव