राज्यात प्रथमच खतबचतीची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST2021-06-03T04:06:46+5:302021-06-03T04:06:46+5:30
नागपूर: बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळविण्यासाठी ‘कृषिक’ ...

राज्यात प्रथमच खतबचतीची विशेष मोहीम
नागपूर: बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळविण्यासाठी ‘कृषिक’ या मोबाइल ॲपमधील गणक यंत्राचा वापर करून राज्यात प्रथमच खतबचतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
अचूक खत मात्रा मिळविण्यासाठी फार क्लिष्ट गणिती सूत्रांचा वापर करावा लागतो. शेतकऱ्यांना खत मात्रा अगदी सहज सुलभ पद्धतीने कशा मिळविता येतील, हे लक्षात घेऊन कृषिक खत गणकयंत्र विकसित करण्यात आलेले आहे.
कृषिक गणकयंत्रांच्या माध्यमातून संबंधित कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठी खतमात्रा परिगणित करण्यासाठी कृषिक मोबाइल ॲपचा अवश्य वापर करा. त्याप्रमाणेच, खतांचा फायदेशीर पर्याय निवडा आणि भरघोस उत्पन्न मिळवा.
शेतकऱ्यांनी अँड्राइड मोबाइल फोनमधील गुगल-प्ले-स्टोअरमध्ये Krushik/ कृषिक सर्च करून अथवा ओ आर कोड स्कॅन करून प्रथम कृषिक ॲप डाऊनलोड करावे व खतबचतीच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.