सोयाबीनला ३,७११ रुपयांपर्यंत भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 20:59 IST2020-09-22T20:56:35+5:302020-09-22T20:59:14+5:30
कळमना धान्यगंज येथीन नवीन सोयाबीन विक्रीचा शुभारंभ सोमवारी झाला. शुभारंभात सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ३,७११ रुपये भाव मिळाला. यावेळी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष गोपाल कळमकर आणि एपीएमसीचे माजी संचालक अतुल सेनाड उपस्थित होते.

सोयाबीनला ३,७११ रुपयांपर्यंत भाव!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना धान्यगंज येथीन नवीन सोयाबीन विक्रीचा शुभारंभ सोमवारी झाला. शुभारंभात सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ३,७११ रुपये भाव मिळाला. यावेळी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष गोपाल कळमकर आणि एपीएमसीचे माजी संचालक अतुल सेनाड उपस्थित होते.
शुभारंभाला बाजारात सोयाबीनची २५०० ते ३ हजार पोती आवक झाली. यावर्षी नागपूर विभागात सोयाबीनचे उत्पन्न कमी आहे. पण सोयाबीन उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुढे सोयाबीनला काय भाव मिळतो, हे सर्वस्वी व्यापाऱ्यांवर अवलंबून आहे. सोयाबीनच्या बोलीत खरेदीदार युनिक ट्रेडर्स, शुभम ट्रेडर्स, बालाजी ट्रेडिंग कंपनी, रिद्दी ट्रेडिंग कंपनी, शालिमार नुट्रीएंट्स, चिंटू पुरोहित, दिनेश मौदेकर, बालू मेंढेकर, मनीष घटे, विशाल संचेती, राजन ट्रेडिंग कंपनी, जेजानी अॅग्रोयांच्यासह मंडळाचे पदाधिकारी नरेश जिभकाटे, निळकंठ हटवार, राजू उमाठे, रहेमान शेख, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, स्वप्निल वैरागडे, पंढरीनाथ मुंडले, रामेश्वर हिरुडकर, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, चंद्रशेखर वाघ, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, संजय बारई, ज्ञानेश्वर गजभिये, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.