स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:55+5:302021-03-09T04:09:55+5:30

नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे ...

The sound of female existence was celebrated in various places | स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा

नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते महिला कोरोना योद्धा डॉ. नैना दुपारे, परिचारिका नीलिमा गजभिये, सीमा नगरारे, आशा वर्कर आरती मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शोभा वंजारी, ॲड. रीना गणवीर, रुबीना अन्सारी, सावला शिंगाडे यांनाही सन्मानित करण्यात आले. संचालन आश्लेषा मेश्राम यांनी केले तर आभार रेखा भावे यांनी मानले. यावेळी खैरे, निशा फुलझेले, वंदना आळे, निशा वानखेडे, विशाखा पाटील, रजनी गजभिये, उषा भावे, विशाखा गेडाम, सुमन घरडे, शालू सावतकर, वैशाली अढाऊ, माया बाळापुरे, सुशील तायडे उपस्थित होते.

---------------

निर्धार महिला व बालविकास समिती ()

नागपूर : निर्धार महिला व बालविकास समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मीना भागवतकर, जया पानतावणे, नूतन रेवतकर, वैशाली धर्मे, रजनी फुलझेले, किरण बगडे, सुनीता कांबळे, प्राची गोडबोले, प्रतीक्षा चव्हाण, ममता खांडेकर या महिलांना निर्धार महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. माया कांबळे होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून रत्ना मेंढे, कांता ढेपे, धंतोली झोन सभापती वंदना भगत उपस्थित होत्या. संचालन नंदा गोडघाटे यांनी केले. यावेळी रत्नमाला मेश्राम, सुनंदा रामटेके, संघमित्रा नारायणे, स्वाती काळे, सोनू झोडापे, भीमराव फुसे, ॲड. सुरेश घाटे, नरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

---------------

Web Title: The sound of female existence was celebrated in various places