विदर्भातील २५० वर रेती घाटांना लवकरच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:26 IST2020-12-16T04:26:40+5:302020-12-16T04:26:40+5:30

नागपूर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील रेती घाटांचे लिलाव आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य पर्यावरण ...

Soon approval for 250 sand ghats in Vidarbha | विदर्भातील २५० वर रेती घाटांना लवकरच मंजुरी

विदर्भातील २५० वर रेती घाटांना लवकरच मंजुरी

नागपूर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील रेती घाटांचे लिलाव आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणाने (एसईआयएए)राज्यातील रेती घाटांचा अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात विदर्भातील ३०० रेती घाटांचा समावेश असून त्यातील २५० हून अधिक घाटांना मंजुरी मिळणार आहे.

प्राधिकरणाची ७ व ८ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. तीत एक हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या व नियमांची पूर्तता करणाऱ्या घाटांनाच मंजुरी देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात पुढील प्रकिया राबविली जाणार आहे.

मंजुरीसाठी शिफारस केलेले

जिल्हानिहाय घाट

नागपूर २३

चंद्रपूर २५

गोंदिया २४

वर्धा ३७

गडचिरोली ४९

यवतमाळ ३२

अमरावती ९६

अकोला १४

------------

एकूण ३००

Web Title: Soon approval for 250 sand ghats in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.