सोनू सूद नव्हे देवदूत, छळ थांबवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST2021-09-22T04:09:55+5:302021-09-22T04:09:55+5:30

नागपूर : अभिनेते, समाजसेवक व आम आदमी पार्टीच्या शिक्षण क्रांतीचे प्रचारक सोनू सुद यांना केंद्र सरकारकडून नाहक ...

Sonu Sood is not an angel, stop persecution () | सोनू सूद नव्हे देवदूत, छळ थांबवा ()

सोनू सूद नव्हे देवदूत, छळ थांबवा ()

नागपूर : अभिनेते, समाजसेवक व आम आदमी पार्टीच्या शिक्षण क्रांतीचे प्रचारक सोनू सुद यांना केंद्र सरकारकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टी युवा आघाडीतर्फे मंगळवारी व्हेरायटी चौकात निदर्शने करण्यात आली. कोरोनाकाळात हजारो नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या सूद यांचा छळ करणे न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

आपचे राज्य कोषाध्यक्ष जगजित सिंग, नागपूर संयोजिका कविता सिंगल, गीता कोईकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ युवा आघाडी संयोजक पीयूष आकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कृतल आकरे, सौरभ दुभे, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, रोशन डोंगरे, स्वप्निल सोमकुवर, हेमंत पांडे, पंकज मेश्राम, प्रियंका तांबे आदींनी आंदोलनात भाग घेतला.

Web Title: Sonu Sood is not an angel, stop persecution ()