चांदणी रंग महाली...‘अप्सरा’ आली!; नटल्या-थटल्या सोनालीच्या अदांनी जिंकले नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:24 IST2017-12-19T11:22:48+5:302017-12-19T11:24:24+5:30
वर्ल्ड आॅरेंज महोत्सवाचा समारोप सोनाली कुलकर्णीच्या नृत्याने झाला. झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तुफान डान्स करीत तिने अवघ्या सभागृहाला सैराट करून सोडले.

चांदणी रंग महाली...‘अप्सरा’ आली!; नटल्या-थटल्या सोनालीच्या अदांनी जिंकले नागपूर
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कोमल कायेला लाभलेले सौंदर्याचे मोहमायी पुनवचांदणे ल्याहून सोन्यात सजलेली अन् रूप्यात भिजलेली महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी मंचावरच्या चांदणी रंगमहाली अवतरली आणि तिच्या पदलालित्यातील यौवन बिजली पाहून प्रेक्षकांनी थेट तोंडात बोटे घातली. वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या समारोपीय सत्रातले सोनालीचे दु
सिल्व्हर स्ट्रिंग्स्चा गोल्डन परफॉर्मन्स
सिल्व्हर स्ट्रिंग हा विदेशी तरुणींचा भारतीय बॅण्ड. या बॅण्डच्या पाच तरुणींनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने महोेत्सवाचा नूरच बदलून टाकला. एकसारखे श्वेत-चंदेरी ड्रेस घालून सिल्व्हर स्ट्रिंगचा काफिला आपल्या इन्स्ट्रूमेंटसह स्टेजवर आला आणि आल्याआल्याच बॉलिवूड ट्रॅक्सवर तू ही तो यार बुलिया...वर धमाकेदार फ्युजन सादर केले. यानंतर एक बॉलिवूड गीत व त्याला हॉलिवूडच्या म्युझिकचा तडका असे लय भारी कॉम्बिनेशन प्रेक्षकांनी अनुभवले. यात कधी हा ग्रुप तू चीज बडी हैं मस्त मस्त गात होता तर कधी जय हो...च्या वेस्टर्न व्हर्जनवर तरुणाईला फेर धरायला लावत होता.
बेफाम नाचल्या लॅटिनो गर्ल्स
नागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल या महोत्सवाच्या शेवटच्या सत्राचे आकर्षण होत्या लॅटिनो गर्ल्स. चमचमत्या कपड्यातील या पाच विदेशी तरुणींनी डोेक्यावर देखणे मोरपीस लावून स्टेजवर फेर धरला तेव्हा प्रेक्षकही थक्क झाले. डान्सचा वेग तुफान असूनही या तरुणींचा आपसातील समन्वय कमालीचा होता. एकामागून एक सलग तीन हॉलिवूड गाण्यांवर सादर झालेले लॅटिनो गर्ल्सचे नृत्य प्रेक्षक डोळ्यात साठवून घेत होते.
