शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद का होत आहेत? - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 10:28 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ?' असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. देशाला महान बनवण्यासाठी पाऊले उचलायला हवीत असे आवाहनही त्यांनी केले. 

नागपूर - कुंभमेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?' असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. मात्र हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनीच याचे उत्तर दिले आहे. 'आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे होते' असं भागवत यांनी म्हटलं आहे.  

नागपूरमध्ये गुरुवारी (17 जानेवारी) प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. जवान शहीद होण्याच्या घटना वाढत जात असल्याचे सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या काळाचा आवर्जून उल्लेख केला. जेव्हा देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळत नव्हते तेव्हा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले जायचे. स्वातंत्र्यानंतर जर कोणत युद्ध झालं किंवा होत असेल तर सीमेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाची सुरक्षा करतात. यानंतर मोहन भागवत यांनी कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद होण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. युद्धाच्या वेळी जवान शहीद होतात पण या घडीला आपल्याकडे कोणते युद्ध सुरू नाही तरीही जवान शहीद होत आहेत याचा अर्थ आपण आपले काम योग्य पद्धतीने करत नाही आहोत. युद्ध नसेल तर सीमेवर जवान शहीद व्हायला नको. मात्र असे होत आहे असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. तसेच देशाला महान बनवण्यासाठी पाऊले उचलायला हवीत असे आवाहनही त्यांनी केले. 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाIndian Armyभारतीय जवानnagpurनागपूर