social troublemakers in Nagpur; Vehicle vandalism | नागपुरात समाजकंटकांचा हैदोस; वाहनांची तोडफोड 

नागपुरात समाजकंटकांचा हैदोस; वाहनांची तोडफोड 

लोकमत न्यूज नेटवकर्क
नागपूर: नरेंद्रनगर, मनिषनगरमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी पहाटे अक्षरशः हैदोस घातला. एक कार पेटवून दिली. तर १० ते १५ वाहनांच्या दगडाने काचा फोडल्या. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास तीन समाजकंटक नरेंद्रनगर, शिल्पा सोसायटी, मनिषनगर परिसरात आले. त्यांनी आधी समीर राऊत यांच्या फोर्ड फिगो कार मधून पेट्रोल काढले आणि कारवर ओतून आग लावली. त्यानंतर या भागातील वाहनांच्या काचा दगडाने फोडणे सुरू केले. सुमारे अर्धा तास एक ते दीड किलोमीटर परिसरातील वाहनांची या समाजकंटकांनी तोडफोड केली.

भल्या सकाळी नागरिकांना जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. अनेकांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळ परिसरात धाव घेतली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात सर्व वाहनांची तोडफोड हे तीन समाजकंटक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या संशयितांना गुरुवारी दुपारपर्यंत १० ते १५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलीस चौकशी करीत होते.

Web Title: social troublemakers in Nagpur; Vehicle vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.