-तर जेवण केले कुणी? नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:50 IST2020-08-07T21:49:32+5:302020-08-07T21:50:33+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यालयीन कामाच्या वेळेत पार्टी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण या पार्टीत कोण आले, कुणी जेवण केले याबाबत एकही साक्षीदार चौकशी समितीला आढळला नाही.

-तर जेवण केले कुणी? नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील पार्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यालयीन कामाच्या वेळेत पार्टी झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण या पार्टीत कोण आले, कुणी जेवण केले याबाबत एकही साक्षीदार चौकशी समितीला आढळला नाही.
चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात दुपारच्या वेळेस एक पार्टी झाली होती. ही पार्टी एका कंत्राटदाराने दिल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शासकीय कामकाजाच्या नियमावलीच्या विरोधात हा प्रकार होता. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन सीईओं संजय यादव यांनी अतिरिक्त सीईओ कमलकिशोर फुटाणे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत पार्टी झाल्याचा एकही साक्षीदार मिळाला नसल्याचा अहवाल फुटाणे यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वांनाच क्लीन चिट मिळाली. या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यामुळे आणखी चर्चेला उधाण आले आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, विभागाच्या समोरच असलेल्या बांधकाम विभागातील कर्मचारी असताना एकही साक्षीदार मिळाला नाही. विशेष म्हणजे या पार्टीची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत होती.