शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश

By नरेश डोंगरे | Updated: September 7, 2022 13:24 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात.

नागपूर: ई-चालानची कारवाई करताना स्वत:च्या मोबाइलचा वापर केल्यास ट्रॅफिक पोलिसावरच ही कारवाई बुमरँग होणार आहे. राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी तसे इशारा वजा सूचना देणारे पत्र राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयांना पाठविले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात.  अनेक वाहनचालक लायसेन्स किंवा गाडीची कागदपत्रेही नाही, असे सांगून कारवाईतून निसटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक पोलीस ई-चालान बनवितात. पुरावा म्हणून स्वत:च्या मोबाइलमधून त्या वाहनाचा अन् नंबरप्लेटचा फोटो घेतात. बरेचवेळा हा ‘डाटा’ त्या पोलिसाच्या मोबाइलमध्येच अनेक दिवस पडून असतो अन् नंतर सवडीनुसार तो डाटा ट्रॅफिकच्या सिस्टिममध्ये अपलोड केला जातो. त्याआधारे दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित वाहनधारकाला नोटीस पाठविली जाते. मात्र, हा प्रकार त्रुटीयुक्त असल्यामुळे अनेकदा वाहन एकाचे अन् दंड दुसऱ्याला असे प्रकार घडतात. संबंध नसताना चालान (नोटीस) आल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक शहरातून अशा तक्रारी वारंवार ट्रॅफिक मुख्यालयात येतात. काही जण वरिष्ठांकडेही पुराव्यासह तक्रारी करतात. मात्र, त्याचा फायदा होत नाही. चूक नसताना निरपराध वाहनधारकाला दंडाची रक्कम भरावी लागते. 

 काय आहे पत्रात?- हा प्रकार अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे गेला. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राज्यातील पोलीस प्रमुखांना, वाहतूक शाखेच्या प्रमुखांना एक पत्र पाठविले. - त्यानुसार, यापुढे ट्रॅफिक पोलिसांनी ई-चालानच्या कारवाईसाठी स्वत:च्या मोबाइलचा वापर करू नये, त्याऐवजी चालान मशीनचा वापर करावा, अशी कडक सूचना या पत्रातून दिली. - याकडे दुर्लक्ष करून जो कुणी पोलीस स्वत:च्या मोबाइलमधून ई-चालानची कारवाई करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

चालान मशीनमार्फतच - डीसीपी आवाड -    या आदेशाची गंभीर दखल घेण्यात आली असून शहर वाहतूक शाखेचे पोलीस चालान मशीनच्या माध्यमातूनच ई-चालानची कारवाई करणार आहेत, अशी प्रतिक्रिया या संबंधाने वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. आमच्याकडे ३०० चालान मशिन्स असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर