शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 11:08 PM

महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण कारवाईमुळे बिथरलेल्या समाज कंटकांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरसंदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. नागपूर शहर स्वच्छ व सूंदर करण्यासोबतच अतिक्रमणाला निर्बंध घालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व विविध सामाजिक संस्थांना विश्वासात घेवून व चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी सदर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून ते आरोपीचा शोध घेत आहे.

जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील नागरिक व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘वॉक अ‍ॅण्ड टॉक विथ मेयर’ आणि ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरात विविध भागात १०० तक्रार बॉक्स लावले. यातीलच हल्दीराम रेस्टारेन्ट शेजारील मेश्राम पुतळा चौक येथे लावण्यात आलेल्या ९६ क्रमाकांच्या तक्रार बॉक्समध्ये या आशयाचे धमकीपत्र टाकण्यात आले होते. तक्रारिंची छाणनी करताना हे धमकी पत्र निदर्शनास आले.शहरातील अतिक्रमणामुळे रस्ते अपघात होत आहेत. वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने अतिक्रमण हटविण्याशिवाय पर्याय नाही. यात पोलीस विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. शनिवारी ७ डिसेंबरला आयोजित महापालिकेच्या विशेष सभेत अतिक्रमण, स्वच्छता यावर जोशी यांनी चर्चा घडवून आणली. २० डिसेंबरच्या सभेत यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच शहर स्वच्छ सूंदर होण्यालाही मदत होणार आहे.शहरातील विविध भागात अवैधरित्या होर्डींग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय संदीप जोशी यांनी घेतला. विशेष म्हणजे या कारवाईची सुरूवात अवैधरित्या लावण्यात आलेल्या महापौरांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगवर पासून केली. यातून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरील राजकीय दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. जोशी यांनी शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तीन दिवसांनी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे कुणाच्याही पोटावर पाय देणार नाही,अशी भूमिका जोशी यांनी घेतली आहे. नागरिकांना चांगल्या सवयी लागल्याशिवाय शहर स्वच्छ, सुंदर होणार नाही. यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक (एनडीएस) गठित करण्यात आले आहे. अस्वच्छता पसरवून शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई उपद्रव शोध पथकाद्वारे केली जाते. यामुळे  अनेक जण दुखावले आहेत. यातीलच एखाद्याने महापौर संदीप जोशी व त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी असलेले पत्र तक्रार पेटीत टाकले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPolice Stationपोलीस ठाणे