शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 16:20 IST

एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपूर : भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला असून यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी वाक्य उलटं म्हटलं. कारण तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे चालवत होते, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. 

ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ महाराष्ट्र (आफ्रोह) या संघटनेतर्फे संविधान चौकात जात प्रमामणपत्र पडताळणी समिती विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या विरोधात उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

२०१४ वा २०१९ मध्ये भाजपविरोधात जे काही कट कारस्थान झाले, त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे संरक्षण होते. कारण प्रमुख व्यक्तीचे समर्थन असल्याशिवाय काहीच होत नाही. उद्धव ठाकरेंनीच तो कट केला असेल, म्हणून अस झालं असावं, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास निघाले होते. असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडींकडे लक्ष घातले असता लक्षात येते की, याच काळात चंद्रकांत खैरे ॲक्टीव झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्‍वासू आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे, असे म्हणत त्यांनी खैरेंवर टीका केली. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना