एसएनडीएलचा लाईनमन दोन हजाराची लाच घेतांना सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:38 IST2019-06-02T00:37:31+5:302019-06-02T00:38:16+5:30
लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले.

एसएनडीएलचा लाईनमन दोन हजाराची लाच घेतांना सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले.
मोहन चंद्रभान गवते (४४) असे आरोपीचे नाव आहे. तो शांतिनगर कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी भोजनालय संचालकाने कामठी रोडवर येथील एसएनडीएल कार्यालयात नवीन वीज मीटरसाठी अर्ज केला होता. त्याला कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शांतिनगर एसएनडीएल कार्यालयातील लाईनमन गवते यांना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर तो शांतिनगर कार्यालयात जाऊन गवतेशी भेटला. गवतेने भोजनालयाच्या संचालकाला तातडीने नवीन मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. परंतु तक्रारकर्त्यास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने एसीबी कार्यालयात तक्रार केली. यानंतर रंगेहात पकडण्यासाठी योजना आखण्यात आली. योजनेनुसार गवते याला शनिवारी दुपारी दोन हजार रुपये देण्याचे निश्चित केले. यानंतर एसीबीच्या चमूने शांतिनगर कार्यालयात फिल्डिंग लावली. भोजनालयाच्या संचालकाकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताच एसीबीच्या चमूने त्याला पकडले. आरोपीविरुद्ध शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.