कारमधून ‘एमडी’ची तस्करी, दोघांना अटक
By योगेश पांडे | Updated: May 7, 2024 15:54 IST2024-05-07T15:51:36+5:302024-05-07T15:54:43+5:30
Nagpur : ‘एमडी’ पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

Smuggling of 'MD' from a car, two arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारमधून एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
मिलींद प्रेम हिरानी (२४, श्रीनगर, मानेवाडा रिंग रोड) व सौरभ गणपतराव हनवंते (२१, शिवशक्ती नगर, हुडकेश्वर) अशी आरोपींची नावे आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकात चारचाकी वाहनातून एमडी पावडरची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारला अडविले. कारची झडती घेतली असता आरोपींकडे १.३४ लाख रुपये किंमतीची १३.४१ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल व कार जप्त केली. दोघांविरोधातही सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, विजय यादव, नितीन साळुंखे, पवन गजभिये, राशीद शेख, सहदेव चिखले, अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.