शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त

By नरेश डोंगरे | Updated: January 22, 2024 20:01 IST

डीआरआयची कारवाई, एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू

नागपूर: आझाद हिंद एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणात तस्करीचे सोने नेले जात असल्याची टीप मिळाल्यानंतर डीआरआयने (महसुल गुप्तचर संचालनालय) तस्कराच्या मुसक्या बांधल्या. त्याच्या ताब्यातून चक्क सव्वातीन किलो सोने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सोने तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईशी जुळलेले धागेदोरे शोधण्यासाठी जागोजागी छापेमारी सुरू असल्याने डीआरआयने कारवाईच्या पाच दिवसानंतरही अधिकृतपणे याबाबतची माहिती जाहिर केलेली नाही.

खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथून पुण्याकडे निघालेल्या आझाद हिंद एक्सप्रेसमधून तस्करीच्या सोन्याची खेप घेऊन काही तस्कर नागपूर मार्गे जाणार असल्याची टीप डीआरआयला १७ जानेवारीला मिळाली होती. त्यावरून डीआरआयने आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये कारवाईची तयारी केली. रात्री ७ च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर डीआरआयच्या पथकाने आरपीएफच्या मदतीने संशयीत तस्कराला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चक्क सव्वा तीन किलो सोने सापडले. सुमारे दोन कोटी रुपये किंमत असलेल्या या सोन्याच्या खरेदी विक्री बाबत तस्करांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्याला अटक करून डीआरआयने त्याची चाैकशी चालविली आहे.

मुंबईत जाणार होते सोनेसूत्रांच्या माहितीनुसार, तस्करीचे हे सोने विदेशातून आणले होते आणि ते मुंबईत एका बड्या आसामीकडे जाणार होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ताब्यात असलेल्या तस्करासह संबंधित साथीदारांकडे डीआरआयने चाैकशी चालविली आहे. त्यासाठी जागोजागी छापेमारी केली जात असल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे. या तस्करीत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याने पाच दिवस होऊनही या कारवाईबाबत डीआरआयने अधिकृत वाच्यता केलेली नाही.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंnagpurनागपूर