शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींनी केला पदाचा गैरवापर

By admin | Updated: January 24, 2016 03:05 IST

हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही,

पंतप्रधानांनी घ्यावा मंत्रिपदाचा राजीनामा : प्रकाश आंबेडकर यांची मागणीनागपूर : हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यात मंत्र्यांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे असूनही मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी त्या विद्यापीठातील कारभारात थेट हस्तक्षेप करीत आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. कायद्याने हा गुन्हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठ हे विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत येते या कायद्यांतर्गत हे विद्यापीठ एक ‘अ‍ॅटोनॉमस बॉडी’ (स्वायत्त संस्था) आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू नेमायचे असतील तर ते या देशातील राष्ट्रपतींद्वारे नेमले जातात. या विद्यापीठातील अभ्यासक्रम युजीसी ठरवित असते. येथील सगळा व्यवहार येथील गव्हर्नन्स बॉर्डी मार्फत पाहिले जातात. स्मृती इराणी या मानव संसाधन मंत्री असल्या तरी त्यांना येथे थेट हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. त्यांना विद्यापीठासंबंधी काही माहिती हवी असल्यास त्या युजीसीमार्फत मागवू शकतात. परंतु स्मृती इराणी यांनी एक नव्हे तर चारवेळा विद्यापीठाशी पत्रव्यवहार केलेला असून त्यात कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.रोहित वेमुला हा हुशार विद्यार्थी होता. दलित असूनही तो जनरल कॅटेगरीतूनच प्रवेश घेत होता. विद्यापीठात आंबेडकरी चळवळ फोफावू नये म्हणूनच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच्यावर साामजिक बहिष्कार घालण्यात आला. त्यातून त्याने आत्महत्या केली. हा ब्रिलियन्सी किल करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक राजू लोखंडे, अ‍ॅड. मिलिंद पखाले, डॉ. संदीप नंदेशवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या भाजप व नरेंद्र मोदींना पाकिस्तानवर हल्ला करण्यास कुणी रोखले आहे, असा प्रश्न उपस्थित करीत पाकिस्तानला त्यांच्या देशात घुसून मारण्यासाठी प्रचंड राजकीय ताकद लागते. मंदिरातील पुजाऱ्याकडून हे काम होऊ शकत नाही, मंदिरातील पुजारी देशाचे संरक्षण काय करणार, अशी टीकाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.